Saturday 5 November 2022

society formation without builder 1

ग्राहक राजा, बिल्डर शिवाय सोसायटीची स्थापना करताना काय काय करावे लागते?

ग्राहक मित्रानो, मागील आठवड्यात फ्लॅटचा ताबा घेतला पण बिल्डरने अजुन सोसायटीची स्थापना केली नाही? त्यामुळे बऱ्याच अडचणी येत आहेत आता काय करायचे याबाबत लेख लिहिला होता.

तर मित्रानो बिल्डरने सोसायटी स्थापन नाही केली तर आपण सर्व फ्लॅट धारक मिळून शासनाकडे बिल्डरचे सहकार्य शिवाय सोसायटी स्थापन करणे साठी प्रस्ताव पाठवू शकतो.

त्याला काय काय करावे लागते हे आता पाहू.

मागील लेखात मी बिल्डरला सोसायटी स्थापन करणेसाठी नोटीस कशी द्यायची त्याचा नमुना दिला होता. त्याप्रमाणे आपण बिल्डर ला प्रथम नोटीस द्या. नोटीस दिल्या पासून १५ दिवसात जर बिल्डर ने सोसायटी स्थापन करणे साठी आवश्यक ती कार्यवाही केली नाही तर आपण पुढे येऊन बिल्डर चे सहकार्य विना सोसायटी स्थापन करू शकतो.
आपण काही लोकांनी पुढाकार घेऊन लोकांना एकत्र करायचा प्रयत्न करा.
प्रथम आपल्या इमारती मधील सर्व लोकांना लेखी स्वरूपात एक सभेचे आमंत्रण द्या ते साधारण पणे खालील प्रमाणे असावे.
 नियोजीत सहकारी गृह निर्माण सोसायटी स्थापन करणे साठी खालील विषयावर चर्चा करून निर्णय घेणे साठी सभा बोलावली आहे असे प्रथम नमूद करा.

विषय
१) सभेचे अध्यक्ष निवडणे
२) नियोजीत सोसायटी चे नाव निश्चित करणे (यात कमीत कमी चार नावे निश्चित करावीत कारण आपल्या परिसरात त्याच नावाची एखादी संस्था असेल तर आपला प्रस्ताव परत केला जाऊं शकतो)
३) सोसायटी स्थापन करणे साठी मुख्य प्रवर्तक यांची निवड करणे
४) मुख्य प्रवर्तक यांना सोसायटी स्थापन करणे साठी खर्चासाठी पैसे गोळा करणे चा अधिकार देणे
५) बिल्डरला नोटीस देणेचा अधिकार
६)सोसायटी स्थापन करणेचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचे कडे दाखल करणे चा अधिकार देणे
७)सोसायटी स्थापन करणे साठी योग्य ती कायदेशीर कारवाई करणे चा अधिकार देणे
८)सोसायटी स्थापन करणे साठी आवश्यक असेल तर वकील किंवा मध्यस्तची नेमणूक करणे आणि त्याला आवश्यक ती फी देणेचा अधिकार 
9)ऐन वेळचे विषय

वरील प्रमाणे सभेचा अजेंडा असावा आवश्यक असेल तिथे योग्य बदल करून घ्यावा. सभेची सूचना शक्यतो १४ दिवस अगोदर द्यावी.
तसेच या व्यतिरिक्त एखादी कमिटी ची निवड करून त्यांना कागदपत्रे गोळा करणे, बँक खाते उघडणे इत्यादी चे अधिकार द्यावेत.

सभेमध्ये सर्व विषयावर लोकांचे विचार करून आवश्यक वाटल्यास प्रत्येक विषयावर बहुमत विचारात घेऊन निर्णय करावा.

सदर सभेनंतर प्रत्येक सभासदाची खालील कागद पत्रे एकत्र जमा करावीत त्यात 
रजिस्टर करारनामा, इंडेक्स २, लाईट बिल, बिल्डर ला दिलेल्या पैशांची माहिती, सभासदाचे नाव, फ्लॅट क्रमांक, फ्लॅटचा एरिया, फ्लॅटची करारनामा प्रमाणे रक्कम, आधार आणि pan card copy, ईमेल आयडी, पत्ता, कामाचे स्वरूप आणि त्याचा पत्ता, तसेच आपण आपल्या सर्व फ्लॅट धारक लोकाकडे बँकेत लोन साठी जी कागद पत्रे लागतात ती एकत्र करावीत त्यात मंजूर नकाशा, complition certificate, 7/12 किंवा सिटी सर्वे चा उतारा, सर्च रिपोर्ट, टॅक्स रिसिप्ट, बिल्डर चे जागा मालक बरोबर झालेला विकसन करारनामा, अफिडविट इत्यादी सर्व कागद पत्रे जमा करावीत.
प्रथम बँकेत खाते उघडणे आणि नाव आरक्षित करणे साठी सहकारी खात्यात, उप निबंधक यांचे कडे अर्ज करावा लागतो. त्या अर्ज बरोबर आपली निवड ही मुख्य प्रवर्तक म्हणून झाली आहे हे प्रमाण द्यावे लागते( सभा वृत्तांत)
यानंतर उप निबंधक हे बिल्डर ला नोटीस काढतात आणि त्यांचे समोर सुनावणी होते.

त्यांची परवानगी मिळाली तर सोसायटी ची स्थापना करणे साठी पुढील कागद पत्रे सादर करावी लागतात. त्यांनी परवानगी नाकारली तर अपील करता येते.

पुढील माहिती पुढच्या लेखात.

आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या.

विजय सागर, 
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005.
तथा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, 
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.

मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०

विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675
*सातारा* - शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* - अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* - रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- 
शशी कांत हरीदास 
9423536395
*सांगली* - सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* - वदंना तोरवणे
9421526777

No comments:

Post a Comment