Saturday 5 November 2022

discount online shopping

*ग्राहक राजा तुझे काही चुकत तर नाही ना?, तू मोहाला बळी पडून स्वतःचे नुकसान तर करून घेत नाहीस ना?*

नुकताच दसरा संपला आणि आता दिवाळीची लगबग चालू असेल त्यात दिवाळीची खरेदी करणे साठी आपण बाहेर पडणार की ऑनलाइनच्या भुल भुलैयात जागतिक कंपनीकडे मोबाईल वर ऑर्डर देऊन घरबसल्या खरेदी करणार? मॉल मध्ये जाऊन एक दिवस खरेदी करून बाहेरच खाऊन घरी रात्री उशिरा येणार?

ग्राहक राजा लक्ष्यात ठेव आपल्याला या मोठ मोठ्या कंपनी बऱ्याच ऑफर देतात आणि वर्तमान पत्रे मध्ये पानेच्या पाने भरून जाहिराती करतात, फेसबुक वापरताना जाहिराती येतात, टीव्ही पाहताना जाहिराती करतात परंतु माझ्या प्रिय ग्राहक राजा आपण लक्षात ठेवा की *भारतात दुबळा एमआरपी कायदा आहे जो केवळ उत्पादक, विक्रेते यांच्या फायद्याचा आहे आणि त्यात आशी तरतूद आहे की उत्पादित वस्तूवर किती किंमत छापावी याला कोणतेही बंधन नाही.*

*बऱ्याच कंपनी या मॉल आणि ऑनलाईन कंपनी यांचे साठी वेगळ्या पॅकिंग करतात आणि त्याच्यावर भरमसाठ किमती छापतात. केवळ सरकार चे डोळ्यात धूळ फेकण्यासाठी किरकोळ पॅकिंग आणि विशेष पॅकिंग मधील मालाला वेगळे नाव देतात आणि भरमसाठ किमती छापतात* 

त्यामुळे वस्तू, कपडे यात साड्या,शर्ट एकावर एक फ्री, पाच घेतल्या तर दहा मिळतील अशी जाहिरात करतात शिवाय ७०% डिस्काउंट अशी जाहिरात केली जाते. वास्तविक जी वस्तू ही ५०० रुपये किमतीची आहे त्याच्यावर २००० रुपये किंमत छापली आणि ती ७०% डिस्काउंट ने विकली जाते तेव्हा त्याच्या खऱ्या किमती पेक्षा जास्त रुपये किमतीला आपण विकत घेतो कारण ७०% डिस्काउंट नंतर तिची किंमत ६०० रुपये होते.

शिवाय आपण जेव्हा मॉल मध्ये किंवा ऑनलाईन खरेदी करतो तेव्हा तिथे आपल्याला ग्राहक म्हणून बार्गैन करायला मिळत नाही.

विनाकारण जास्तीची खरेदी होते आणि आपण ज्या या मोठ्या मल्टी नॅशनल कंपनी आहेत त्यांना अजून मोठे करतोच शिवाय आपल्या शेजारी, गावात असणाऱ्या आपल्याच दुकानदार, रस्त्यावर विक्री करणारे छोटे विक्रेते यांच्यावर नकळत अन्याय करतो. शिवाय आपला पैसा हा बाहेरील देशात जाणे साठी हातभार लावतो. ग्लोबलायझेशनच्या मुळे सरकार याबाबत काही करू शकत नाही.
शिवाय या मोठ्या ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनी या चायनीज माल ठेवतात आणि आपण नकळत आपल्या शत्रूला मदत करतो. 

यासाठी ग्राहक राजा सजग हो जास्तीच्या मोहाला बळी पडू नकोस कारण कोणीही आपली वस्तू स्वतःच्या खिशातील पैसे टाकून तुम्हाला देणार नाही.
त्याच्या वस्तूंची मुळ किंमत, जाहिराती, विपणन व्यवस्था, ट्रान्सपोर्टचा खर्च, शिवाय नोकरांच्या पगाराचा खर्च आणि फायदा या विक्री किमतीत समाविष्ट असल्या शिवाय विक्री करत नाहीत.


दिवाळी हा सर्व सणांचा राजा आहे त्यामुळे आपलं सर्व लक्ष हे दिवाळी साठी खरेदी करणे, घर घेणे, घरासाठी काही वास्तू घेणे यावर आहे.

एक लहान मुलाचे पत्र सध्या खूप व्हायरल झाले आहे आपल्या मुख्यमंत्रीना पत्र लिहिले आहे त्याला त्याची आई सांगते की तू वडिलांकडे पैसे मागू नकोस नाहीतर ते आत्महत्या करतील कारण त्याचे वडील हे खूप कमी शेती असणारे शेतकरी आहेत वगैरे.
 
*ग्राहक मित्रानो कोणतेही सरकार आले तरी शेतकरी आत्महत्या प्रश्न सुटणार नाही कारण त्याचे मूळ कारण हा ग्राहक आणि सरकारी धोरण हा आहे.*

आपण यासाठी काय करू शकतो तर आपण शक्यतो आपल्या गावातील शहरातील छोट्या व्यापारी वर्गाकडून, छोट्या रस्त्यावरील विक्रेतेकडून वस्तू खरेदी करा, भाजी पाला खरेदी करा त्यामुळे एक साखळी तयार होते त्यात शेतकरी, शेतकरी वर्गाकडे काम करणारे कामगार जे पीक तोडून देतात किंवा मशागत करतात ते, वाहतूक करणारे टेम्पो चालक, छोटे दुकानदार, विक्रेते आणि त्यांच्याकडे काम करणारे कामगार या सगळ्यांची दिवाळी ग्राहकांवर अवलंबून आहे. आपण यांच्या कडून खरेदी केले तर नक्कीच त्यांची त्यांची दिवाळी गोड होईल शिवाय आवश्यक तेवढेच खरेदी करा आणि आपले पैसे वाचवा, उपभोगावर संयम ठेवा, अनावश्यक खर्च टाळून आपली, आपल्या समाजाची आणि आपल्या देशाची प्रगती करणेस हातभार लावा.

ग्राहक म्हणून संपूर्ण अर्थव्यवस्था आपणावर अवलंबून आहे. आपण अर्थ चक्राला गती देऊ शकतो जेव्हा आपण केवळ आपल्या देशातील कंपनी, शेतकरी व्यापारी यांचे कडून खरेदी केली तर.

आपण ही दिवाळी साजरी करताना ऑनलाईन खरेदी न करता, मोठ्या मॉल मध्ये न जाता छोट्या व्यापारी, फेरीवाले यांचे कडून खरेदि करून साजरी करूयात.

कोणतीही वस्तू एमआरपी किमतीत न खरेदी करता बिनधास्त बार्गेन करायला शिका त्यात कोणताही कमीपणा नाही. शिवाय खरेदी केले की त्याची पावती आवश्यक घ्या.

आपणास खरेदी करताना काही अडचणी आल्या तर आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे मोफत मार्गदर्शन साठी संपर्क साधा.

विजय सागर
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
६३४, सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे 
४११०३०.

मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: 
*दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*

विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675

*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,

श्री दिपक सावंत 9833398012

*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 
*सातारा* - शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* - अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* - रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- 
शशी कांत हरीदास 
9423536395
*सांगली* - सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* - वदंना तोरवणे
9421526777

No comments:

Post a Comment