Saturday 5 November 2022

Parking not to be sold by builder

*पार्किंग तर विकत घेतले आहे आणि सोसायटी हेच पार्किंग दुसऱ्याला देऊ शकते मग बिल्डर ला दिलेले पैसे कसे वसूल करायचे..... जाणून घ्या*

पार्किंग विकता येत नाही आणि सोसायटी सदर विकत घेतलेले पार्किंग काढून घेऊ शकते असा निकाल ठाणे अतिरिक्त ग्राहक आयोगाने दिल्यावर बऱ्याच ठिकाणी सभासद आणि सोसायटी मॅनेजमेंट यांच्यात वाद सुरू झाले आणि लोक सोसायटी ला दोष देऊ लागलेत.

वास्तविक जी वस्तू आपली नाही, ज्याच्यावर आपला हक्क नाही अशी वस्तू आपण विकू शकत नाही. त्याच प्रमाणे बिल्डर हा कोणतेही पार्किंग मग ते स्टील्ट फ्लोअर, पोडियम पार्किंग, ओपन पार्किंग, मल्टी स्टोरी पार्किंग असे कोणतेही पार्किंग विकू शकत नाही.
सुप्रीम कोर्टाने पण यावर शिक्का मोर्तब केले आहे पण ग्राहक पण मुर्खासारखे बिल्डर ला पैसे देत आहेत आणि बिल्डर पण बिनधास्त पार्किंग विकत आहेत.

 बिल्डर लोकांची लॉबी/असोसिएशन/ संघटन आहे त्यामुळे ते एक मेकांना सहाय्य करत कायद्यात पकडता येऊ नये अशी तरतूद करारनामा करताना करतात. पार्किंगचे वेगळे पैसे दाखवले जात नाहीत, पार्किंग साठी रोख स्वरूपात रक्कम स्वीकारतात किंवा पार्किंग हे इन्फ्रास्ट्रक्चर चे नावाने विकत आहेत.

आपण ग्राहक म्हणून जेव्हा असे फसवले जातो तेव्हा आता काय करायचे असा प्रश्न पडतो.

*तर ग्राहक राजा आता तरी जागा हो.* सोसायटीला दोष न देता आपण बिल्डर ला दिलेले पार्किंग चे पैसे कसे वसूल करायचे हे पहा.

प्रथम आपण बिल्डर ला सदर पार्किंग चे पैसे परत मागा. आधी लेखी स्वरूपात बिल्डर ला एक नोटीस द्या. आता नोटीस द्यायची म्हणजे वकील हवाच असे अजिबात नाही. मंडळी जेव्हा वकील नोटीस देतात तेव्हा त्यातील पहिले वाक्य असते की माझ्या अशिलाने सांगितले नुसार सदर नोटीस देत आहे. तेव्हा नोटीस द्यायला वकील हवा असे नाही. आपण रजिस्टर पोच पावती, स्पीड पोस्ट ने बिल्डर ला स्वतः नोटीस द्या. ती खालील प्रमाणे असावी.

प्रेषक:
ग्राहकाचे पूर्ण नाव,
पत्ता........
दिनांक:

प्रति,
श्री/सौ/श्रीमती...........
पार्टनर/प्रोप्रायटर,
मेसर्स............(फर्म चे नाव)
पूर्ण पत्ता.......


विषय : पार्किंग पोटी घेतलेले रक्कम रुपये ......व्याजासह परत मिळणे बाबत.

महोदय,
मी........आपल्या ........स्कीम............मध्ये बिल्डिंग क्रमांक ......फ्लॅट क्रमांक...... खरेदी केला आहे. त्याचा करारनामा हा रजिस्टर क्रमांक........रजिस्टर ऑफिस....... येथे दिनांक.........रोजी......अनु क्रमांक.......नुसार नोंदला आहे. सदर करार नामा पोटी मी एकूण रुपये.......इतके आपणास दिले आहेत आणि त्यात पार्किंग पोटी रुपये........इतके आपणास दिले आहेत.
मला नुकतेच समजले आहे की पार्किंग हे मोफा कायदा १९६३ नुसार, सुप्रीम कोर्टचे आदेश नुसार विकता येत नाही तसेच नुकताच ठाणे येथील ग्राहक आयोगाने सोसायटी चे लोकांना बिल्डर नी विकलेले पार्किंग काढून घ्यायला आदेश दिले आहेत.

आमची सोसायटी देखील आता अशे पार्किंग परत काढणे चे बाबत विचार करत आहे तरी आपण मला पार्किंग साठी घेतलेले रुपये.......१८% व्याजासह येत्या दहा दिवसात परत करावेत ही विनंती.
आपण जर मला दहा दिवसात वरील प्रमाणे रक्कम रुपये.......दहा दिवसात प्रत केले नाहीत तर मला योग्य त्या न्यायालयात दाद मागावी लागेल तसेच मी नविलाज म्हणून आपल्या विरुद्ध पोलिसांकडे फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यासाठी अर्ज देऊन याची आपण नोंद घ्यावी तसेच यासाठी लागणारा खर्च आपणाकडून वसूल केला जाईल.

सदर नोटीस चा खर्च रक्कम रुपये १०००/- आपणावर राहील.

कळावे,
आपला विश्वासू,

नाव,
पत्ता
तारीख
सही.
 
वरील प्रमाणे नोटीस देऊन पण बिल्डर ने पैसे परत केले नाही तर आपण ग्राहक आयोग, स्थाई लोक अदालत कडे दाद मागू शकता.

आपणास मोफत मार्गदर्शन हवे असल्यास आपण वेबसाईट ला भेट द्यावी.

www.ABGPINDIA.com

विजय सागर, 
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005.
तथा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, 
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०


विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675

No comments:

Post a Comment