Saturday 5 November 2022

Electricity meter charges

नमस्कार ग्राहक राजा,
आपण नवीन फ्लॅट घेतो किंवा आपण घर घेतो त्यासाठी वीज कनेक्शन हवेच असते आणि सदर वीज कनेक्शन साठी बिल्डर आपणाकडून रुपये 50000/- ते रुपये 100000/- एवढा खर्च मागतो आणि आपण पण सदर पैसे कोणतीही खळखळ न करता बिन बोभाट पणाने देतो. 

आपण बाजारातून, भाजी मार्केट मधून किरकोळ खरेदी करतो तेव्हा अत्यंत चिकिस्ता करतो पण इथे मात्र डोळे झाकून बिल्डरने मागितले म्हणून पैसे देऊन मोकळे होतो.

मंडळी आपण कोणताही मागचा पुढचा विचार न करता किती बेमालूम पणाने फसतो याचा विचार केला आहेत का?

आता तुम्ही म्हणाल की बिल्डर ने करारनामा मध्ये नमूद करून वीज मीटर साठी पैसे घेतले आहे मग त्यात बेकायदेशीर काय आहे?
मंडळी आपण करारनामा करत असताना तो वाचत नाही आणि करारनामा केला म्हणजे पैशाची सर्व मागणी कायदेशीर आणि रास्त आहे असेही नाही. कित्येक वेळेला करार नामे करून एकच फ्लॅट चार चार जणांना विकलेला आहे म्हणजे सर्व कायदेशीर का? जरा विचार करा.

आपण ग्राहक आहात आणि आपणास आपल्याला मिळणाऱ्या सेवेसाठी, त्यातील लाईट मीटर साठी किती पैसे लागतात, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ किती पैसे घेते हे विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. 

*सिंगल फेज मीटर जो जवळ जवळ ९०% लोकांचे घरी बसतो त्याला रुपये 2230/- ते रुपये 4420/- एवढाच खर्च येतो.*

आता आपण म्हणाल की दोन हजाराचा फरक का तर जमिनी वरून टाकलेली केबल आणि जमिनी खालून टाकलेली केबल यावर हा चार्ज अवलंबून असतो.

तुम्ही विचार करा जर एखादी बिल्डिंग ही 100 फ्लॅटची आहे आणि तिथे 100 मीटर बसणार असतील आणि बिल्डर हा प्रत्येक फ्लॅट धारक कडून रुपये 50000/- ते रुपये 100000/- एवढे घेत असेल तर जी खरी रक्कम लागते त्यापेक्षा ही रक्कम रुपये 45000/- ते रुपये 95000/- प्रत्येक फ्लॅट मागे जास्त आहे.

*म्हणजेच एका 100 फ्लॅट चे स्कीम मध्ये रुपये 45 लाख ते रुपये 95 लाख एवढी रक्कम आपणा सर्व ग्राहकांकडून जास्तीची वसूल केली जाते.* 

आमच्या कडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे, काही ग्राहक येतात आणि सांगतात की त्यांचे  बिल्डर सांगत होते की महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ मध्ये पैसे खायला घालायला लागतात, मंडळी प्रत्येक मीटर साठी रुपये 45000/- ते रुपये 95000/- एवढी रक्कम खायला घालायला लागते का? 

आपण आपले जवळचे विद्युत मंडळातील ऑफिस मध्ये माहिती अधिकारचे अंतर्गत अर्ज करा आणि आपल्या मीटर साठी किती रक्कम लागली याची माहिती मागवा, आपल्या मिटर साठीचे कोटेशन ची प्रत मागा, भरलेल्या पैशाची पावती ची प्रत मागा.

माहिती अधिकारातून आपणास कळेल की आपण किती फसवले गेलो आहोत. त्यात बिल्डर कडून किती फसलो आहे आणि बिल्डर म्हणतो तर म.रा. वि. वी. कंपनीचे लोक किती पैसे घेत आहेत हे पहा.

ग्राहकराजा आपण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ तसेच बिल्डरला नोटीस देऊन आपले जास्तीचे पैसे व्याजासह परत मागा तो आपला कष्टाचा पैसा आहे. 
त्याला 15 दिवसाची मुदत द्या आणि 15 दिवसात दिले नाही तर सरळ आपल्या जिल्हा ग्राहक आयोगाकडे दाद मागा नक्की आपणास आपले पैसे परत मिळतील.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते आपणास या कामी नक्की मदत करतील.
आपल्या माहिती साठी विद्युत मंडळाचे अधिकृत दर खाली देत आहोत.

*महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी चे CE (dist)/M-III/schedule of charges/ 09078 तारीख 7/04/2020 नुसार घरगुती व शेती साठीचे नवीन मीटर घ्यायचे असेल तर त्याचे एकूण चार्जेस खालील प्रमाणे आहेत.*

A) सिंगल फेज 0.5kw रुपये 2230/- घराचे वरील केबल साठी (ओव्हरहेड केबल)

B) सिंगल फेज 0.5kw रुपये 4420/- जमिनीचे खालील केबल साठी 

C) थ्री फेज मीटर साठी 
9100/- जमिनीचे खालील केबल साठी 

D) थ्री फेज मीटर साठी 
15700/- घराचे वरील केबल साठी (ओव्हरहेड केबल)

वरील चार्जेसचे ब्रेकअप खालील प्रमाणे आहे.

*1) नवीन वीज कनेक्शन साठी अर्जाची किंमत आणि नोंदणी शुल्क खालील प्रमाणे आहे.*

सिंगल फेज 110/-
थ्री फेज 160/-
शेती पंप 160/-

*2) मीटर चार्जेस, मीटरींग कॅबिनेट/ क्युबिकल सह*

सिंगल फेज 820/-
5 ते 30A साठी 
(आर एफ मीटर)

सिंगल फेज 2610/-
10 ते 60A 
(स्मार्ट मीटर)

b) थ्री फेज 1520/-
10 ते 40A   साठी (आर एफ मीटर)

थ्री फेज 3790/-
10 ते 60A साठी
(स्मार्ट मीटर)

*3) सर्व्हिस कनेक्शन चार्जेस (वरील केबल साठी)*
 
*सिंगल फेज* 

0.5 किलो वॉट साठी 1300/-

0.5 ते 7.5 किलो वॉट साठी =1700/-

*थ्री फेज*

20 किलो वाट पर्यंत 7200/-

*किंवा*

*3. सर्व्हिस कनेक्शन चार्जेस (जमिनी खालील केबल साठी)*
 
*सिंगल फेज*

0.5 किलो वॉट साठी 3400/-

0.5 ते 7.5 किलो वॉट साठी 
7600/-

*थ्री फेज*

20 किलो वाट पर्यंत 13800/-


*4) टेस्टिंग चार्जेस*

सिंगल फेज  110/-

थ्री फेज 220/-

ग्राहक राजा वरील चार्जेस हे अधिकृत चार्जेस आहेत आणि सदर सर्कुलरची प्रत अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे आहे. आपण आपल्या वीज बिलात किती किलो वॉट दाब मंजूर आहे ते तपासा आणि आपल्याला प्रत्यक्ष किती चार्जेस लागले ते पहा.

सदर माहिती आपणास माहिती अधिकारात विद्युत मंडळकडून सुधा मिळेल.

तेव्हा आता शॉक लागल्यासारखे बधीर न होता आपले गेलेले जास्तीचे पैसे नक्की वसूल करा.

सामुदायिक रित्या आपल्यावर झालेल्या अन्याया विरुद्ध लढा संघटित व्हा. न्याय नक्की मिळेल.

आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे मोफत सल्ला घेऊ शकता.

आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या.

विजय सागर, 
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005.
तथा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, 
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.

मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०

विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675
*सातारा* - शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* - अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* - रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- 
शशी कांत हरीदास 
9423536395
*सांगली* - सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* - वदंना तोरवणे
9421526777

No comments:

Post a Comment