Saturday 5 November 2022

flat booking tips

प्रिय ग्राहक मित्रानो  
आपण फ्लॅट बुक करताना त्या साईट जवळ हेरिटेज बिल्डिंग आहेत का? त्या साईट जवळ एअरपोर्ट आहे का?
त्या साईट जवळ डिफेन्स चे कोणते ऑफिस किंवा युनिट आहे का? 
त्या साईट जवळ रेड झोन आहे का? 
नो फ्लाय झोन तसेच समुद्र, नदी, धरण यांचे पाण्याचे जवळ जेव्हा बांधकाम होते तेव्हा पूर रेषा जवळ असते त्यामुळे तेथील बिल्डिंग परमिशन साठी देखील अडचणी असतात. एक सजग ग्राहक म्हणून आपण हे सर्व पाहिले पाहिजे.
जर वरील पैकी काही गोष्टी असतील तर बिल्डिंग परवानगी देताना वास्तविक या गोष्टी महानगरपालिका, नगरपालिका किंवा टाऊन प्लॅनिंग, कलेक्टर यांनी पाहूनच परवानगी दिली पाहिजे. परंतु भ्रष्ट अधिकारी वर्ग हे पाहात नाहीत आणि त्यामुळे बिल्डर लोकांचे काम सोपे होते पण ग्राहक मात्र फसवला जातो. त्याची आयुष्याची पुंजी ही वाया जाऊ शकते.
जानेवारी २०२२ मध्ये कोचीन मध्ये चार टॉवर जमीनदोस्त केले गेले. कारण ते समुद्रापासून जवळ होते. शिवाय आता माहिती अधिकारात एखाद्याने माहिती मागवली आणि त्यानंतर तक्रार केली तर लगेच ग्रीन ट्रिबूनल तसेच डिफेन्स मधील ऑफिसर, हेरिटेज डिपार्टमेंट हे कारवाई करू शकतात. तेव्हा बिल्डर बुकिंग करताना काहीही म्हणत असतील की आपली पोहोच वर पर्यंत आहे तरी शेवटी कायद्या समोर सर्व सारखे असतात. सरकारी ऑफिसर कितीही भ्रष्ट असले तरीही जेव्हा माहिती अधिकार आणि सेवा हमी कायद्याने जेव्हा त्यांच्या नोकरीवर शेकायची वेळ येते तेव्हा त्यांनी पैसे खाल्ले असले तरीही आदेश देऊन बांधकाम o
पाडू शकतात. शिवाय कोर्ट आणि ट्रिबूनल हे आदेश देऊन बांधकाम पाडू शकते. बिना परमिशन घेता केलेले बांधकाम देखील याच मुळे घेऊ नये.
ग्राहक स्वस्त घर मिळते म्हणून तसेच बिल्डर हा लोन करून देतोय मग काय हरकत आहे किंवा बँक लोन देती आहे म्हणजे सर्व कायदेशीर आहे असा गैर समज अजिबात करून घेऊ नका. आपण स्वतः खात्री करा आणि मगच बुकिंग करा. बिल्डर कधी कधी लवकर बुक केले तर आपणास अमुक एक लाख रुपये सुट मिळेल अशी जाहिरात करतात. अशी जाहिरात आली की प्रथम सदर बिल्डर ची आणि प्रोजेक्ट ची संपूर्ण माहिती काढून घ्या आणि नंतरच बुकिंग करा. 

नुकतीच एक बातमी आपण वाचली असेल की नोयडा मधील दोन ट्वीन टॉवर इमारती जमीनदोस्त केला आहे.
तर मित्रानो हे कशामुळे झाले तर अवैध बांधकाम झाले होते. इतर इमारती मधील आणि या इमारती मधील अंतर हे खूप कमी होते त्यामुळे शेजारील इमारतींना त्रास होत होता. सुरक्षा व्यवस्था चांगली नव्हती त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिले आहेत.

मुंबई मधील ४८ उंच इमारती पाडण्यासाठी मुंबई हाई कोर्ट ने जुलै मधे कलेक्टर ना तसेच मुंबई महानगर पालिकेला आदेश दिले आहेत कारण त्या इमारती ह्या एअरपोर्ट पासून जवळ आहेत आणि नो फ्लाय झोन मध्ये येत आहेत.

शिवाय आपण उंच इमारतीमध्ये राहायला जातो तेव्हा तेथील फायर फाईटिंग व्यवस्था कशी आहे ते अवश्य पहा. कित्येक बिल्डर हे आग प्रतिबंधक उपाय योजना व्यवस्थित करत नाहीत. पाण्याचे पाईप असतात पण त्यातून पाणी येत नाही कारण आग प्रतिबंध करणे साठी वेगळी पाण्याची टाकी ही बांधलेली नसते. फायर पंप हे काम करत नाहीत, पंप कित्येक वर्षे चालू केलेले नसतात त्यामुळे जेव्हा आग लागते तेव्हा ती आग प्रतिबंधक सिस्टीम चालू होत नाही.  त्यामुळे जर आग लागली तर आपणास जीवाला मुकावे लागेल. 

तेव्हा ग्राहक मित्रानो सजग व्हा. आंधळे पणाने घर खरेदी करू नका. 

आपणास ग्राहक म्हणून काही समस्या असतील तर नक्की आमच्या वेबसाईट ला भेट द्या.
 www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या.

शिवाय ग्राहक शक्ती वाढवणे साठी आणि आपण ग्राहक म्हणून संघटित होणे साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सभासद व्हा आणि आपली ताकद वाढवा. सभासद होणे साठी खालील लिंक वर क्लिक करा 
https://rzp.io/l/ABGPmembership

विजय सागर, 
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005.
तथा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, 
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.

मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०

विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675

*ठाणे*- श्रीमती  स्मिता जामदार 9819438286,

श्री दिपक सावंत  9833398012

*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 
*सातारा* - शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* - अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* - रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- 
शशी कांत हरीदास 
9423536395
*सांगली* - सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* - वदंना तोरवणे
9421526777

No comments:

Post a Comment