Saturday 5 November 2022

parking problems in society

*पार्किंग संदर्भातील प्रश्न आणि समाधान : जागो ग्राहक, समझो ग्राहक?*

पार्किंग विकता येत नाही आणि सोसायटी सदर विकत घेतलेले पार्किंग काढून घेऊ शकते असा निकाल ठाणे अतिरिक्त ग्राहक आयोगाने दिल्याची पोस्ट प्रचंड प्रमाणात सोशल मीडिया वर वितरीत झाली आणि ग्राहकांनी असंख्य प्रश्न विचारले, फोन वर फोन येत राहिले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सर्व कार्यकर्ते रोज 150-200 फोन घेत आहेत. इंडिया दर्पण या भावेश ब्राह्मणकर यांचे न्यूज पोर्टल वर सदर लेख आल्यामुळे महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातून फोन सतत येत आहेत.
*अखिल भारतीय ग्राहक पंचायत म्हणून ग्राहकांच्या विविध प्रश्नांची उत्तरे आपल्या माहिती साठी एकत्र देत आहे.*

*ग्राहक*: बिल्डरने एक इमारत बांधली. सदनिका व ज्यांना पाहिजे त्यांना पार्किंग विकले. खरेदीखतात तशी नोंद पण केली आहे. सोसायटी झालेली नाही. होण्याची शक्यता नाही. कारण कोणीही त्यासाठी उत्सुक नाही. अशावेळी काय करावे? ज्यांनी पार्किंगची जागा विकत घेतली ती त्यांच्याच मालकीची राहील ना? कारण सोसायटीच नाही.

*उत्तर*: सदर पार्किंगची जागा की कॉमन आहे आणि बिल्डरने सोसायटी स्थापन केली नाही तर आपण स्वतः ती स्थापन करून घेऊ शकता किंवा आपण त्याबाबत ग्राहक आयोगात तक्रारही दाखल करू शकता.

*ग्राहक* :
1.नवीन जागा घेत असताना पार्किंग लॉट बद्दल नक्की व्यवहार कसा करावा?
2.कोणत्या प्रकारे पेपर वर्क करावे म्हणजे पार्किंग लॉट आपल्याला कायदेशीर मिळेल आणि कोणीही आपल्याकडून काढून घेऊ शकणार नाही?

*उत्तर*: कायद्या प्रमाणे सदर जागा ही सोसायटीची असते. सर्व ग्राहकांनी एकत्र राहून कोणीही पार्किंग विकत घेऊ नये. सोसायटीने सदर पार्किंग रोटेशन पद्धतीने देऊन सर्व सभासदांना पूर्ण विश्वासात घेतले तर चांगले. आपण फ्लॅट बघत असताना असे पाहा की सर्व फ्लॅट ना किमान एक पार्किंग उपलब्ध आहे. कारण बिल्डरला कॉर्पोरेशन/यूनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोलरुल प्रमाणे काही पार्किंग ठेवणे बंधनकारक असते. कित्येक कॉर्पोरेशन मधील हे जुनाट नियम बदलले पाहिजेत. कारण आता सार्वजनिक सोई नाहीत त्यामुळे प्रत्येक माणूस गाडी घेतो आणि पार्किंग प्रत्येकाला हवेच शिवाय visiter पार्किंग पण हवे. त्यामुळे अशा ठिकाणी नवीन फ्लॅट घ्या जिथे मुबलक पार्किंग आहेत.

*ग्राहक*:जर मला रजिस्टर डॉक्युमेंट नुसार पार्किंग विकले असेल तर काय बिघडते. रजिस्टर खरेदी असेल आणि त्यावर स्टॅम्प डुटी भरली असेल तर ते कायदेशीर असते ना?

*उत्तर*: खरेदी विक्री चे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस सरकार वसूल करते पण स्टॅम्प ॲक्ट १९०८ नुसार सदर व्यवहार हा कायदेशीर आहे की बेकायदा हे तपासणे रजिस्ट्रेशन अथॉरिटी चे काम नाही कारण नुकताच स्टॅम्प ॲक्ट १९०८ वर हायकोर्ट ने निर्णय दिला आहे की रजिस्ट्रार ची जबाबदारी ही फक्त सरकार ला रेव्हेन्यू देणे, विकणार आणि घेणार यांना ओळखणे तेवढीच असते. स्टॅम्प ड्युटी भरून तर कित्येक व्यवहार हे दोन दोन तीन तीन व्यवहार एकच फ्लॅट वर केलेले आहेत त्यांचे रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी पण भरलेले आहे तरीही सदर व्यवहार बेकायदेशीर असतो कारण फ्लॅट विक्री ही महाराष्ट्र फ्लॅट ओनर्शिप कायदा १९६३ आणि रेरा कायद्याखाली होते त्यामुळे सदर कायद्यात पार्किंग विकणे साठी परवानगी नाही कारण सदर बाब ही कॉमन अमेनेटी मध्ये येते.


*ग्राहक:* मोकळ्या जागेवरील पार्किंग साठी पण हाच नियम आहे का? शिवाय स्टील्ट पार्किंग, बेसमेंट पार्किंग ला पण हा नियम लागू आहे का?


*उत्तर* होय, सर्व प्रकारचे पार्किंग हे सोसायटीचे मालकीचे असतात. 
*ग्राहक*: सर, खुप महत्वाची माहिती आहे.
पण फक्त जिथे सोसायटी रजिस्टर्ड नाहीत किंवा काॕमन पार्किंग एरिया बिल्डरने काही तरी तांत्रिक बाजु तयार करून स्वतः कडे ठेवलाय अशा ठिकाणी प्रश्न आहे काय करावे,   

*उत्तर:* आपण मोफा कायद्या प्रमाणे सोसायटी स्थापन झाले नंतर चार महिन्यात खरेदी खत झाले नाही म्हणून त्याचे वर केसेस दाखल करू शकता आणि सदर बिल्डर वर पोलिसात FIR देखील दाखल करू शकता. 

*ग्राहक*: जिथे जास्त सोसायटी असतात तिथे कॉमन जागेची मालकी कोणाकडे असते.

*उत्तर*: जास्त सोसायटी असतात तिथे फेडरेशन स्थापन करून कॉमन जागेची, अमेनिटीची मालकी हस्तांतरित करून घेऊ शकता.

*ग्राहक*: सदर पार्किंग बाबत किती कोर्टनी निकाल दिले आहेत.

*उत्तर*: पार्किंग बाबत ठाणे येथील ग्राहक आयोग, मुंबई मधील अपिलेट कोर्ट, ताडा न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्ट यांनी निकाल दिले आहेत आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे सर्व निकालांची कॉपी आहे.

*ग्राहक*:मी नवीन फ्लॅट घेऊ इच्छितो त्यात पार्किंग साठी बिल्डर वेगळे पैसे रोख स्वरूपात मागत आहे. काय करू.

*उत्तर*: अजिबात फ्लॅट खरेदी करू नका, पार्किंग विकत कधीही घेऊ नका.

*ग्राहक*: गॅरेज आणि इतर पार्किंग यात काय फरक आहे.

*उत्तर*: गॅरेज म्हणजे जिथे गाडी पार्क केल्या नंतर शटर/दार बंद करून घेता येते आणि त्याच्या वर आणि बाजूला बंदिस्त भिंत सदृश्य बांधकाम असायला हवे तर त्याला गॅरेज म्हणतात. सदर गॅरेज हे एफ एस आय मध्ये येते त्यामुळे ते विकू शकतात.

*वरील सर्व कोर्टनी निकाल दिला आहे की पार्किंग, ओपन स्पेस, गार्डन इत्यादी विकू शकत नाही*.

www.ABGPINDIA.com

विजय सागर, 
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005.
तथा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, 
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
मार्गदर्शक:
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675
विजय सागर
9422502315

No comments:

Post a Comment