नुकताच हायकोर्ट ने निकाल दिला आहे की जमिनीचे तुकडे पाडून त्याची खरेदी विक्री वर सरकार रोख लावु शकत नाही.
वास्तविक सदर निकाल हा फक्त १९०८ चे स्टॅम्प duty रजिस्ट्रेशन बाबत आहे.
आपण पेपरमधे छोट्या जाहीरातीमधे, हँडबीलद्वारे तसेच रस्त्याचे बाजुला फ्लेक्स द्वारे, फेसबुक व व्हाट्सअप द्वारे तसेच भिंतींवर व लाईटमीटरच्या डिपीवर १ ते ११ गुंठेचे प्लाँट स्वस्तात उपलब्ध म्हणुन असंख्य जाहीराती वाचतो व सदर व्याक्तीस फोन करुन जमीनीचे व्यवहार करतो.
वास्तवीक पाहाता १ ते ११ गुंठे जमीन विकणारे लोक हे बेकायदेशीर व्यवहार करणारे लोक असतात. जमीनीचे खरेदिमधे आपली फसवणुक होऊ नये म्हणुन आपण स्वताच काळजी घेतली पाहिजे. शेतीचे जमीनीची बेकायदेशीर प्लाँटिंग करुन सामाईक विक्री केली जाते. घर बांधणेस जमीन खरेदी करताना सदर जमीन अकृषीक (NA) आहे का हे अगोदर पहावे. फक्त NA जमीनच खरेदी करावी. शेती झोनची जमीन कमीत कमी ११ गुंठे खरेदी करावी लागते व एजंट लोक ५-१० लोकांना एकत्रीत प्लाँटची विक्री करतात कारण शेतीची जमीन ही कमीत कमी ११ गुंठेच विकावी लागते त्याशीवाय सात बारा ला नोंद होत नाही. परत विक्री करताना तसेच घर बांधताना बरोबरच्या खरेदीदारांमधे भांडणे होतात तसेच सेपरेट ७-१२ उतारा होत नाहीत. तरी ग्राहकांनी स्वस्त प्लाँटविक्रिस फसु नये.
जमीन खरेदी करताना जमीनीचे मालकांची खात्री करुन घ्यावी तसेच ७-१२ उतारा, फेरफार उतारे काढुन शहानिशा करावी. जमीनीचा झोनचा दाखला काढुन जमीन शेती झोन आहे की रहिवाशी झोन आहे ते पहावे. फाँरेस्ट झोन( वन क्षेत्र) असेल तर जमीन अजीबात खरेदी करु नये. तसेच जमीन सरकारने अधिगृहीत केली असेल (aquired) तर खरेदी करु नये. तसेच जमीनीवर सरकारने Development Plan मधे काही रिझर्वेशन टाकले आहे का ते पहावे. कारण रस्ते, सार्वजनीक सोई सुविधांसाठी जमीनिवर आरक्षण टाकलेले असते. जमीनीचे सर्व कागदपत्रे एखाद्या वकिलास दाखवुन मगच खरेदी करावे म्हणजे फसवणुक होणार नाही. जमीन स्वकष्टार्जीत असेल तर मालक विक्री करु शकतो पण जर जमीन ही वडिलोपार्जीत असेल तर सर्व १८ वर्षे वरील वारसांची संमंत्ती अवश्यक असते. तसेच जमीन इनाम कींवा वतनाची नाहीना हे पण पहावे कारण वतनाची जमीन विकत घेणेसाठी शासनाची परवानगी लागते.
जमीन खरेदीबाबत मोफत सल्ल्यासाठी ग्राहकांनी आधी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे आपल्या जिल्ह्यातील व्यक्तीशी संपर्क साधवा.
आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या.
विजय सागर,
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005.
तथा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०
विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
No comments:
Post a Comment