Saturday, 5 November 2022

one time maintenance of flat illegal by builder

फ्लॅट बुक करताना वन टाईम मेंटेनन्स घेणे.... कायद्यात तरतूद नाही.

ग्राहक राजा, बिल्डरने सोसायटीची स्थापना केली किंवा सर्व फ्लॅट धारक एकत्र येऊन बिल्डर शिवाय सोसायटीची स्थापना केली असेल परंतु वन टाईम मेंटेनन्स जो प्रत्येक फ्लॅट धारकाकडून बिल्डरने वसूल केला होता तो  सोसायटीला  परत केला नाही. आपण काय करायचे?

मित्रानो महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्ट १९६३ (मोफा) नुसार बिल्डरने सोसायटीची स्थापना ही ५१% लोकांनी फ्लॅटचे बुकिंग केल्या नंतर, ५१% लोकांनी फ्लॅटचा करारनामा केल्या नंतर चार महिन्याचे आत करायचे असते. 

बिल्डर हा मोफा कायदा तसेच सहकार कायदा १९६० नुसार सोसायटीची स्थापना करत नाही हाच मुळी गुन्हा आहे. शिवाय वन टाईम मेंटेनन्स घेतो हा दुसरा गुन्हा आहे.

आपण फ्लॅट बुक करतो तेव्हा बिल्डर करारनामा  करताना आपणाकडून वन टाईम मेंटेनन्स मागतो आणि अगदी गोड भाषेत सांगतो की आपण सदर रक्कम ही लोन प्रपोजल मध्ये म्हणजेच agreement मध्ये समाविष्ट करतोय त्यामुळे तुम्हाला आता खिशातून पैसे द्यावे लागणार नाहीत. ग्राहक म्हणून आपण पण कसे बेमालूम रित्या विश्वास ठेवतो आणि त्यासाठी लगेच तयार होतो किंवा बिल्डर त्या शिवाय agreement करतच नाही वगैरे वगैरे...

जेव्हा आपण फ्लॅट चा ताबा घेतो त्यानंतर पण बिल्डर हे सोसायटीची स्थापना करत नाहीत. एखादी इमारत तयार होते त्याचे पार्ट कंप्लिशन घेऊन आपणास कधी कधी ताबा दिला जातो. बिल्डरची साईट अजून चालूच असते. इतर इमारती साठी लागणारे मटेरियल, त्या सामानाची देखभाल साठी लागणारे वॉचमन, इमारत बांधकामासाठी लागणारे पाणी, वीज बिल इत्यादी खर्च बिल्डर करत असतो आणि जेव्हा दोन तीन वर्षांनी सोसायटीची स्थापन केली जाते तेव्हा बिल्डर आपले वन टाईम मेंटेनन्स हे संपले आहे उलट मलाच अजून पैसे सोसायटीचे सभासदाकडून जमा करून द्या असे सांगतो.
 
कित्येक इमारतीमध्ये सोसायटी स्थापन करत नाही शिवाय सार्वजनिक लाईट मीटरचे बिल भरले जात नाही तेव्हा लाईट मीटर हे वीज मंडळ काढून नेते. 
टँकर द्वारे पाणी पुरवठा करणे बंद केले जाते. सोसायटी स्थापन केलेली नसल्यामुळे लोकांमध्ये एकजूट नसते आणि फ्लॅट धारक लोकांचे हाल सुरू होतात. वरच्या मजल्यावर राहणारा फ्लॅट धारक लाईट मीटर नसले मुळे लिफ्ट बंद असल्यामुळे जिन्याने वर जात असतो. अक्षरशः पैसे देऊन पण लोक हवालदिल झालेले असतात. मुलांना संस्कार वर्गात टाकतात पण स्वतः एकत्र येऊन आपले प्रोब्लेम सोडवत नाहीत. एकमेका बरोबर भांडत बसतात.

वास्तविक वन टाईम मेंटेनन्स फ्लॅट परचेस करणाऱ्या ग्राहकांकडून घेणे कायद्यात नाही. आपण mofa कायद्यात स्वतः मॉडेल agreement कसे करायचे याची माहिती करून घ्या.

बिल्डर ने आपणा कडून घेतलेला वन टाईम मेंटेनन्स हा वेगळे अकाऊंट काढून त्यात ठेऊन सोसायटीला व्याजासह परत करायला हवा. तो स्वतःचे मर्जीने खर्च करून लोकांना काहीबाही हिशोब देऊन पैसे परत करत नाही अशा असंख्य तक्रारी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे येत असतात.

तेव्हा आपण अशा परिस्थितीत काय करू शकतो पाहा

१) बिल्डर वर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हा नोंदवू शकता. 
२) ग्राहक आयोगात तक्रार दाखल करू शकता
३) उप निबंधक, जिल्हा निबंधक, सहकारी संस्था यांचे कडे तक्रार करू शकता
 
पोलीस ग्राहकांना गुन्हा नोंदवण्यात सहकार्य करत नाहीत अगदी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीकडे काही फ्लॅट धारक पोलीस पण आले आहेत पण त्यांचाही गुन्हा त्यांचे पोलीस स्टेशन मध्ये नोंदवून घेत नाहीत हे आपले दुर्दैव आहे .

त्यावर उपाय खालिल प्रमाणे:- 
१) आधी सहाय्यक  पोलीस कमिशनर यांचे कडे तक्रार करा नंतर पोलीस कमिश्नर कडे तक्रार दाखल करावी

२)पोलीस प्राधिकरण कडे सदर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदारची आणि वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर यांची तक्रार करायची, 

३)रजिस्टर पोस्ट ने पोलिसांना गुन्हा लिहून पाठवून द्यायचा,

४)ऑनलाईन गुन्हा नोंदवावा 

५) सरळ जवळच्या क्रिमिनल कोर्ट मध्ये जाऊन साध्या कागदावर दहा रुपयाचे तिकीट लावून पोलिसांना गुन्हा नोंदवणे साठी आदेश द्यायचे साठी अर्ज करायचा. 

पोलिसांकडे जायचे म्हणजे ग्राहक घाबरतात जणू काही त्यांनी गुन्हाच केला आहे.

आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करावे असे त्यांना वाटते.

ग्राहक मित्रानो आपण सर्व एक झालो ना तर नक्की सगळी विघ्ने दूर होतील.
तेव्हा सरळ वरील प्रमाणे तक्रार करा. गप्प बसू नका. अन्याय सहन करणारा पण अन्याय करणाऱ्या प्रमाणे त्यास जबाबदार आहे.

आपणास संपूर्ण मोफत मार्गदर्शन करणे साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कार्यकर्ते सदैव आपल्या बरोबर राहतील. फक्त तुम्ही एकत्र या मित्रनो.

याबाबत आणखी माहिती हवी असल्यास आपण अवश्य संपर्क करावा.

आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या.

विजय सागर, 
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005.
तथा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, 
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.

मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०

विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675
*सातारा* - शुभदा नागपूरकर 7972477892
*अहमद नगर* - अतुल कुऱ्हाडे 9860365551
*नाशिक* - रवींद्र अमृतकर 9860798999
*जळगाव* डॉ अनिल देशमुख 9422541881
*पुणे जिल्हा* दिलीप निंबाळकर 8623815103
*पंढरपूर*- 
शशी कांत हरीदास 
9423536395
*सांगली* - सुर्यवंशी सर्जेराव 9763722243
*कोल्हापूर*- सुप्रिया ताई 7038887979
*नंदुरबार* - वदंना तोरवणे
9421526777

No comments:

Post a Comment