गुळातील भेसळ कशी ओळखावी आणि कोणता गूळ चांगला.
आज दसरा आहे आणि वीस दिवसांनी दिवाळी येणार आहे त्यामुळे आपण घरी मिठाई तयार करतो आणि बाजारातून पण मिठाई घेतो पण याचाच फायदा हा असामाजिक तत्व असणारे व्यापारी घेतात. गुळामधे भेसळ करून ग्राहकांच्या आरोग्यास धोका होईल असा व्यापार करतात.
भारतीय पारंपरिक पद्धतीने तयार केलेला गूळ हा आरोग्यास चांगला असतो त्यामुळे पचन चांगले होते, अनिमिया होत नाही, चांगली रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
पाश्च्यात्य संस्कृतीने साखरेचा वापर वाढला आणि अंध अनुकरणामुळे आपण आपले आरोग्य खराब करत गेलो. खरे तर साखरे मुळे जाडी वाढते, रक्त अशुद्ध होते, रक्तातील शुगर वाढते त्यामुळे जास्त आजार होतात.
करोना काळात लोकांना गुळाचे महत्व पटले तसेच भारतीय आयुर्वेदाचे पण महत्त्व पटले. आपल्या संस्कृतीचे प्रतीक असलेले गूळ पाण्याने स्वागत करणे लोप पावले.
त्यामुळे करोना काळात लोकांनी गूळ खायला जास्त सुरुवात केली. निरनिराळे काढे त्यात गूळ घालून पिणे वाढले.
परंतु जास्त नफा कमावणे साठी काही महाभाग लोकांनी गुळात साखर मिक्स करून, खराब झालेले चॉकलेट मिक्स करून, काही ठिकाणी विविध कमी दर्जाचे धान्याच्या पावडरी, रांगोळी इत्यादी मिक्स करून लोकांना भेसळ युक्त गूळ विकू लागले.
नुकतेच काही ठिकाणी फूड आणि ड्रग डिपार्टमेंट ने छापा मारून भेसळ युक्त लाखो रुपयांचा गूळ जप्त केला आहे. या ठिकाणी जुन्या खराब झालेल्या गुळामध्ये साखर आणि इतर केमिकल मिक्स करून लोकांना खाण्यास लायक नसलेला गूळ विकताना लोकांना पकडले आहे.
गूळा मध्ये काही भेसळ आहे का हे खालील प्रमाणे आपण तपासू शकता.
आपण गूळ घेऊन तो काचेच्या एका भांड्यात घ्यावा त्यात हैड्रॉक्लोरिक एसिड (HCL) चे दोन थेंब टाकले आणि जर फसफसले तर समजा की सदर गूळ हा भेसळ युक्त आहे.
कॅल्शियम कार्बोनेटचा वापर हा गुळाचे वजन वाढवणे साठी केला जातो, कॅल्शियम बाय कार्बोनेट चा वापर हा गुळाला जास्त चमकदार, आकृष्ट करण्यासाठी केला जातो.
काही ठिकाणी खडूची पावडर ही गुळात मिक्स करून विकतात तेव्हा आपण थोडा गूळ पाण्यात टाकून पहिला तर पाणी गढूळ झाले तर त्यात खडू पावडर मिक्स केली आहे हे समजावे.
गुळाचा रंग हा पिवळा आकर्षक असेल तर समजावे की त्यात केमिकल मिक्स केले आहे.
खरे तर गुळ तयार करायला कोणतीही सबसिडी नाही, साखर कारखानादार हे राजकारणाशी संबंधित असल्यामुळे साखरेला सबसिडी मिळते, शिवाय साखरेचा भाव सरकार निश्चित करते, त्याची एफआरपी निश्चित करते शिवाय साखर कारखान्यानी पैसे कसे द्यायचे याबाबत साखर आयुक्त आदेश देऊ शकतात परंतु गुळाला मात्र कोणतेही शासकीय अनुदान नाही, पारंपरिक पद्धतीनेच गूळ बनतो. त्याच्यासाठी कोणतेही मार्गदर्शन सरकारी पातळीवर केले जात नाही. गुळाचे मानांकन केले जात नाही त्यामुळे त्याचा दर्जा निश्चित केला गेला नाही. सरकारने या पारंपरिक व्यवसायास वाचवणे साठी पावले उचलली पाहिजेत कारण गेल्या दोन तीन वर्षात कोल्हापूर मधील गूळ तयार करणारे कारखाने(गुऱ्हाळ) जे वैयक्तिक लोक चालवत होते त्यातील सुमारे 1000 कारखाने बंद पडले आहेत. नवीन पिढी गुळाचे उत्पादन करणे साठी पुढे येत नाही. कामगार लोकांची वानवा आहे त्यामुळे या व्यवसायाकडे लोक आकृष्ट होत नाहीत. वास्तविक पाहता या बाबत अधिक संशोधन करून सदर व्यवसाय वृध्दी साठी प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळे एक्सपोर्ट वाढून शेतकरी वर्गास केमिकल फ्री गूळ उत्पादनास प्रोत्साहन दिले पाहिजे.
व्यापारी लोकांशी बोललो असता आमच्या असे निदर्शनात आले आहे की कोल्हापूर मधील गुळाचा दर्जा चांगला असतो त्यामुळे त्याला मागणी जास्त असते त्यामुळे तो जास्तीत जास्त बाहेरील राज्यात जातो आणि त्यातील जवळ पास ८०% गूळ हा गुजरात राज्यात जातो.
कोल्हापूर मधील व्यापारी वर्ग म्हणतो की येथील गूळ हा खूप चांगला असतो पण बारामती आणि कर्नाटक राज्यातील गूळ हा भेसळ युक्त असतो.
गूळ कडक बनणे साठी उसाच्या रसाला जास्तीत जास्त उकळून त्यातील पाण्याचा अंश काढून टाकून आणि त्यातील मळी काढून केला तर त्याची क्वालिटी चांगली मिळते परंतु असे करण्यास इंधन जास्त लागते तसेच त्यास वेळ जास्त लागतो त्यामुळे काही ठिकाणी सदर प्रोसेस जलद होणे साठी केमिकल मिसळले जाते, गूळ तयार करताना घट्ट पणा येणे साठी त्यात काहीबाही मिसळले जाते त्यामुळे वेळ कमी लागतो, रंग चांगला येतो परंतु तो खाण्यास अयोग्य असतो.
शक्यतो डार्क तपकिरी रंगाचा गुळच खरेदी करावा. गूळ खरेदी करताना पहावे की गूळ हा घट्ट असावा (हार्ड). शक्यतो मऊ नसावा. गूळ थोडा खाल्ला असता जर त्याची चव थोडी जरी खराब, खारट लागली तर त्यात नक्की केमिकल मिक्स केले आहे हे समजावे, गुळात साखरे सारखे क्रिस्टल असतील तर त्यात गोड करण्यासाठी काही केमिकल मिक्स केले आहेत हे समजावे.
डार्क तपकिरी रंगाचा गूळ हा शक्यतो घ्यावा कारण गूळ उत्पादन करताना उसाचा रस हा गरम करताना त्यात भेंडीचा पाला टाकून त्यातील मळी बाहेर काढली जाते परंतु केमिकलचा उपयोग करून सदर गुळास आकृष्ट रंग देणेसाठी वापर केला जातो. त्यामुळे सदर गूळ खाण्यास अयोग्य असतो.
आपण कोणत्याही दुकानातून गूळ खरेदी केला असेल तर त्याची पावती नक्की घ्या. पावती असेल तर आपण याबाबत फूड आणि ड्रग डिपार्टमेंट कडे तक्रार करून याचा बंदोबस्त करू शकता.
गूळ खराब असेल तर दुकानदार गूळ बदलून देतो म्हणजे सदर दुकान दारास माहीत आहे की असा केमिकलयुक्त गूळ विकतो आहे आणि तोही त्या कटात सामील आहे. कारण १००० ग्राहकांमध्ये एखादाच ग्राहक हा असे गूळ बदलण्यासाठी व्यापारी वर्गाकडे जातो आणि लाखात एखादाच ग्राहक हा तक्रार करणे साठी पुढे येतो.
तेव्हा माझ्या ग्राहक मित्रानो आपण पण लाखात एक व्हा. असा
खराब केमिकल युक्त गूळ विकला असेल तर त्या दुकानदारास आणि उत्पादन करणाऱ्या कारखानदाराला धडा शिकवा आणि आपल्या पुढील पिढीला या विषयुक्त गुळा पासून मुक्त करा.
तक्रार करणे साठी खालील प्रमाणे...
हेल्प लाईन फोन नंबर
1800 222 365
Email: jc-foodhq@gov.in
Website link :
http://fda.maharashtra.gov.in/
विजय सागर
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
६३४, सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे
४११०३०.
वेबसाईट:
www.abgpindia.com
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा:
*दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर
No comments:
Post a Comment