Saturday, 5 November 2022

possession of flat not in time

ग्राहकांनो आपणास घर/फ्लॅट चा ताबा/पझेशन वेळेवर मिळाले नाही तर आपण काय काय नुकसान भरपाई मागू शकता? आणि कशी....

जागो ग्राहक जागो!

ग्राहक मित्रानो आपण बिल्डर कडे फ्लॅट बुक केला त्याबरोबर करारनामा केला आणि त्यात ताबा/ पझेशन ची तारीख ही समजा १ मार्च २०२२ अशी लिहिली आहे पण आता जून महिना उजाडला तरीही पझेशन मिळाले नाही ते साधारण १ जुलै २०२२ ला मिळेल असे बिल्डरने सांगितले आहे त्यामुळे आपणास काय काय नुकसान होते त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

*काही जुनी लोक आहेत ते म्हणतील की ४ महिनेच फक्त उशीर होत आहे त्यात काय विशेष आमच्या काळी तर चार चार वर्षे घराचा ताबा उशिरा मिळत होता किंवा मिळत पण नव्हता, आपण बिल्डरचे काहीही वाकडे करू शकत नाही कारण बिल्डर पैशाने तकदवान असतो वगैरे वगैरे.*

पण माझ्या ग्राहक मित्रानो आपणास माहीत आहे का? मोफा कायदा, रेरा कायदा, ग्राहक संरक्षण कायदा १९८६ आणि २०१९ नुसार आपणास उशिरा ताबा/ delay in possession साठी बिल्डर कडून नुकसान भरपाई मिळू शकते. नव्हे तशी नुकसान भरपाई कित्येक ग्राहकांना जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग यांनी दिलेली आहे.

आता आपण पाहू की आपणास काय काय नुकसान होत आहे.

1) उशिरा ताबा मिळाला तर जितके दिवस/महिने उशिरा ताबा मिळतो त्या काळासाठी सध्या राहत असलेले घराचे घरभाडे भरतो त्याची नुकसान भरपाई मागू शकता.
2) जर त्या काळातच आपणास घर बदलावे लागले असेल जसे ११ महिन्याचा करारनामा संपला असेल तर आपणास ब्रोकरेज १-२ महिनाचे भाडे द्यावे लागले असेल तर तेही नुकसान भरपाई म्हणून मागू शकता.
3) आपण बिल्डरला जेवढे पैसे फ्लॅट पोटी दिले आहेत त्यावर बँकेत भरावे लागलेले व्याज आपण नुकसान भरपाई म्हणून मागू शकता.
4) आपण घराचा हप्ता ( EMI) शिवाय घरभाडे अशा दोन्ही गोष्टी भरता त्यामुळे आपणास फिनासिअल / आर्थिक भार पडतो त्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो, जीवनातील इतर गोष्टीवर खर्च करू शकत नाही, कित्येक गोष्टी मन मारून मुकाट्याने सहन कराव्या लागतात, त्यामुळे कोटुंबिक कलह निर्माण होतो त्याची भरपाई पण आपण मागू शकता.
5) इन्कम टॅक्स कायद्या नुसार घराचे पझेशन मिळाले वर आपणास घरावरील कर्जाचे व्याजवर वजावट तसेच प्रिन्सिपॉल चा क्लेम आपण करू शकता पण पझेशन मिळाले नाही तर त्यास आपण मुकता त्यामुळे सदर नुकसान भरपाई पण आपण निश्चित मागू शकता.
6) समाजामध्ये आपली पत/ इभ्रत जाते कारण आपण घरमालकाला, मित्र आणि नातेवाईक यांना मला १ मार्च ला लझेशन मिळणार असे सांगतो पण ते मिळत नाही त्यामुळे समाजात आपली पत ढासळते, घरमालक घराबाहेर काढू शकतो. 
यासाठी आपण नुकसान भरपाई मागू शकता.
7) आपणास घर मार्च मध्ये मिळाले नाही त्याऐवजी ते जुलै मध्ये मिळणार आहे आणि काही कारणास्तव आपणास आपले घर विकायचे आहे, आपल्याला घर विकून मुलीचे लग्न करायचे आहे, घर विकून मुलांना परदेशात पाठवायचे आहे पण घर तयार नाही त्यामुळे विकायला गेले तर कमी पैसे मिळतात. होणारी नुकसान भरपाई ही बिल्डर मुळेच होती कारण त्याने उशिरा ताबा देणे, प्रोजेक्ट वेळेवर तयार न होणे त्यामुळे सदर नुकसान
भरपाई पण मिळू शकते. 
8) काही बँकेत कर्जाचा हप्ता हा पूर्ण कर्ज रक्कम दिल्यानंतर सुरू होतो आणि तो पर्यंत फक्त प्री ई. एम. आय. व्याज बँक घेते अशा वेळी कर्ज फेडणेचा कालावधी हा लांबत जातो त्यामुळे त्यावेळी जर व्याज वाढलेले असेल तर त्यामुळे नुकसान होते. काही लोक हे रिटायर होणार असतात आणि त्यांना पेन्शन पण मिळत नाही अशा वेळी शेवटी कर्ज फेडणे थोडे अशक्य होते त्यामुळे भविष्यात होणारी नुकसान भरपाई ही बिल्डर कडून मागावी.
9) आपल्या मुलांना आपण नवीन घर मिळणार आहे त्यामुळे त्या घराशेजारी असणारी शाळा निवडतो पण जुने घर मात्र त्या शाळेपासून लांब आहे त्यामुळे त्यासाठी स्पेशल रिक्षा/बस लावावी लागते त्याचे चार्जेस आपण नुकसान भरपाई म्हणून मागू शकता.
10) आपले तसेच आपल्या घरातील लोकांचे ऑफिस जवळ आहे म्हणून आपण नवीन घर ऑफिस जवळ घेतो. जुने भाड्याचे घर हे ऑफिस पासून लांब आहे. जेव्हा उशिरा ताबा मिळतो तेव्हा आपणास तसेच आपल्या घरातील इतराना ऑफिसला जाणे येणे साठी रिक्षा, मोटार सायकल, टॅक्सीचा जो अतिरिक्त खर्च येतो तो आपण बिल्डर कडून मागू शकता.

तेव्हा मित्रानो उशिरा ताबा याबाबत आपण वरील बाबीवर लक्ष दिले आहे का?.
आणि जिथे जास्त फ्लॅट आहेत तिथे कॉलेक्टीवली सगळ्यांचे किती नुकसान होते. 
समजा एखाद्या प्रोजेक्ट मध्ये 100 फ्लॅट आहेत तिथे उशिरा ताबा मिळाला आणि साधारण घरभाडे रुपये 15000 प्रती महिना असेल तर फक्त घरभड्या पोटी सगळ्यांचे मिळून एका महियाला रुपये 15 लाख नुकसान भरपाई होते आणि चार महिन्यांचे रुपये 60 लाख एवढी फक्त घरभाड्या पोटी नुकसान भरपाई होते. 

इतर दहा बाबी ज्या वर नमूद केल्या आहेत त्याचा विचार केला तर किती नुकसान भरपाई ही एका उशिरा ताब्यामुळे होते याचा हिशोब करा.

ग्राहक मित्रानो आपण घर विकत घेताना सर्व इमारतीतील लोक एकत्र नव्हतो पण आपण आता तरी एकत्र आहोत तेव्हा एकत्रित रित्या लढा द्या. 

आपण जिल्हा ग्राहक संरक्षण आयोग (50 लाख रुपये चे खाली फ्लॅटची किंमत असेल तर), राज्य ग्राहक संरक्षण आयोग (रुपये 50 लाख ते रुपये 2 कोटी पर्यंत घराची किंमत असेल तर) आणि राष्ट्रीय ग्राहक संरक्षण आयोग (रुपये 2 कोटी पेक्षा जास्त घराची किंमत असेल तर) नुकसान भरपाई मागू शकता.

तेव्हा ग्राहक मित्रानो आता तरी संघटित व्हा आपले हक्क समजून घ्या. एकित बळ असते हे लक्षात घेऊन एकत्रित लढा द्या.

शिवाय ग्राहक हा राजा आहे तेव्हा राजाने लढले पाहिजे रडून काही उपयोग नाही. 

बिल्डर हा पैसे वाला आहे किंवा त्याच्यावर राजकीय वरदहस्त आहे, त्याच्याकडे गुंड गिरी आहे असे काही ग्राहक नेहमी ग्राहक पंचायत कडे तक्रारी करत असतात आणि शिवाजी हवा आहे पण मी तो होणार नाही अशी मनोवृत्ती झालेली आहे.
मित्रानो आपण घाबरता न डगमगता आपण आपली झालेली नुकसान भरपाई मागा. मी स्वतः 1991 मध्ये बिल्डर कडून अशी नुकसान भरपाई घेतलेली आहे. शिवाय एनसीडीआरसी या वेबसाईट वर असे असंख्य निकाल आहेत.

ग्राहक मित्रानो आपण भीक मागत नाही तर आपला हक्क मागतो आहे हे लक्षात ठेवा आणि केंद्र शासनाने सदर ग्राहक संरक्षण कायदा, रेरा कायदा हा ग्राहक संरक्षणासाठी केला आहे त्याचा फायदा घ्या.

आपणास काहीही मार्गदर्शन हवे असेल तर आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत कडे मोफत सल्ला घेऊ शकता.

आमची वेबसाईट www.ABGPINDIA.com ला अवश्य भेट द्या.

विजय सागर, 
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत,
गली नंबर 21, जोशी मार्ग, करोल बाग, नई दिल्ली 110005.
तथा
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, 
६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.

मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०

विजय सागर
9422502315
श्री विलास लेले
9823132172
सौ अंजली देशमुख
9823135803
श्रीमती विजया वाघ
9075132920
श्री रवींद्र वाटवे
9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित
9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर
7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी
7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी
9890652675

No comments:

Post a Comment