Monday 18 June 2018

पोलीस तक्रार कशी करावी

ग्राहक पंचायतीच्या सर्व खंद्या कार्यकर्ते व मित्रांनो
आपण ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शन केंद्र चालवत असताना आपणास बर्याच वेळा सल्ला मागणेस येणार्या व्यक्तिला पोलिसांमधे जाऊन गुन्हा नोंदवणेस सांगणे भाग पडते.

सदर व्यक्ती कधिही पोलिसांमधे गेलेली नसती तसेच पोलीस स्टेशन मधे गेल्यावर बर्याच वेळा तक्रार नोंदवुन घेतली जात नाही.

आपल्या पोलीस स्थानाचे हद्दिमधे गुन्हे कमी होतात हे दाखवणेसाठी तक्रार नोंदवणेस हयगय होती. तसेच गुन्हेगारांशी, बड्या असामींशी असलेल्या संबंधांमुळे, पैशाचे जोरावर सत्ता ऊपभोगत असलेल्या लोकंविरुध्द शक्यतो गुन्हे नोंदवले जात नाहीत. तसेच FIR नोंदवला की त्याचा तपास करणे व कोर्टात केस दाखल करणे यासाठी मेहनत घ्यावी लागते. मनुष्यबळ लागते त्यामुळेही पोलीस शक्यतो गुन्हा नोंदवणेस मागे पुढे पाहतात, टाळतात.

वास्तवीक पोलीसांकडे नागरीक गेला की प्रथम माहीती अहवाल (FIR) नसार गुन्हा नोंदवुन पुढिल तपास करावा असे कायदा सांगतो.

आपल्या माहितीसाठी सोबत पोलीस मँन्युअल ३ खंड जाडत आहे. सदर पोलीस मँन्युअल चा बारकाईने अभ्यास करावा व नागरीकांना पोलीसांकडुन सहकार्य देणेस भाग पाडणेसाठी उभे करावे, सक्षम करावे.

ग्राहकांना चांगले मार्गदर्शन करणेसाठी याचा आपणास फायदा होईल.

आपले एक खंदे कार्यकर्ते श्री रामेश्वर कुटे, कर्जत यांनी सदर पोलीस मँन्युअलस माहीती अधिकार अंतर्गत कमिशनरकडुन मिळवली आहेत.
सदर श्री रामेश्वर कुटे यांनी त्यांच्या बिल्डरवर गुन्हे नोंदवणेस कसुर करणार्या  पोलिस ठाण्याचे कर्मचारी वर्गास कायद्याने भाग पाडले आहे.

तसेच आपण आपणाकडे येणारे  नाडलेल्या ग्राहकांना सक्षम करणेसाठी सदर पोलिस मँन्युअलचा अधार घ्यावा.

www.abgpindia.com

विजय सागर
अध्यक्ष,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत, (पुणे महानगर)
६३४, सदाशिव पेठ,पुणे ३०

No comments:

Post a Comment