Friday, 12 August 2016

Night life कायदा, पोलीस व शासन

महाराष्ट्र सरकारने काल 12 ऑगस्ट 2016 रोजी पुणे तसेच नागपूर येथे मुंबई, ठाणे प्रमाणे हाॅटेल तसेच बार रात्री दिड पर्यंत ऊघडे ठेवणेस परवानगी दिली आहे. यावरून आपण परदेशातील अनुकरण करत आहोत व काही प्रमाणात त्याची गरज पण आहे.

पण आजच विमान नगर परीसरात बेकायदेशीर रीत्या पहाटे पर्यंत हॉटेल्स, बार व पब ऊघडे असतात त्यामुळे सामान्य माणसाला तरूण, दंगेखोर, गुंड व पैशाचा माज असलेल्या लोकांमुळे त्रास होतो ही पण बातमी आली आहे. महिलांना त्रास होत आहे.

अशा परिस्थितीस केवळ सरकार आणि प्रशासन जबाबदार आहे.  कारण सर्व नागरिकांना समान अधिकार आहेत पण आपल्या वागण्याचा त्रास ईतर नागरिकांना होवू नये हे लोक विसरतात.

तसेच सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेतली जात नाही त्यामुळे अशी प्रवृत्ती वाढली आहे. केवळ निर्भया केस सारखी केस झालेवर मलमपट्टी लाऊन ऊपयोग नाही.

परदेशातील कायदेशीर कारवाईची तसेच वेळेत न्याय मिळवून देण्यासाठीची पध्दतीचा पण अंगीकार करणेची अवश्यकता आहे.

पण सरकार तसेच सर्रासपणे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन फक्त सामान्य माणसालाच कायद्याची तंबी द्यायची व गुंड व धनदांडगे यांना मोकळे सोडायचे धोरण ठरवले आहे.

भ्रष्टाचार करून भुजबळांसारखे राजकारणी,पोलीस अधिकारी हे पुढच्या सत्तर पिढ्या बसून खातील एवढी माया जमवून बसले आहेत व लाखात एक माणूस पकडला जातो तोही केवळ इतरांना वाटून खात नाही अथवा राजकारणात डोईजड झाला आहे म्हणून.

माय बाप सरकारने आता वेळ वाया न घालवता  कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू करावी व खुशाल नाईट लाईफ सुरू करावी अन्यथा सामान्य माणूस जागा होऊन सरकारला जाग आणेल. मागे न्यायालयात व ईतर ठीकाणी समाजाने एकत्र येऊन गुंडांना कायदा हातात घेऊन मारले आहे कारण सामान्य माणसाला कायद्याने न्याय मिळत नाही असे वाटते आहे. कायद्यावरचा विश्वास उडाला आहे.

1 comment:

  1. हाॅटेल रात्री 11 वाजेपर्यंत चालु पाहिजे

    ReplyDelete