कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन उत्पादनाची खरेदी करणं ग्राहक तसेच कंपनीच्या सोयीचं असलं तरी वेबसाइटवरील एखादी चूक कंपनीला किंवा ग्राहकांना महागात पडू शकते याचा प्रत्यय नुकताच आला. स्नॅपडीलची एक चूक कंपनीला चांगलीच महागात पडली आणि २९ हजाराचा 'आयफोन ५ एस' हा महागडा मोबाईल एका विद्यार्थ्याला अवघ्या ६८ रुपयात मिळाला.
पंजाब विद्यापीठातील बी-टेकचा विद्यार्थी निखिल बंसलला १२ फेब्रुवारी २०१५ रोजी स्नॅपडीलच्या वेबसाइटवर 'आयफोन ५ एस' वर ९९.७ टक्के डिस्काउंटची ऑफर दिसली. ही ऑफर दिसताच निखिलने तत्काळ ६८ रुपये ऑनलाइन भरून फोनची ऑर्डर दिली. फोनची ऑर्डर दिल्यानंतर निखिलला बरेच दिवस कंपनीकडून फोन दिला गेला नसल्याने निखिलने पंजाबच्या संगरूर जिल्हा ग्राहक मंचाकडे स्नॅपडीलविरुद्ध तक्रार दाखल केली. वेबसाइटने जी डिस्काउंटची ऑफर दिली होती त्यानुसार फोन देण्यात नकार दिला असं निखिलने तक्रारीत म्हटलं. तर आपली बाजू मांडताना कंपनीनं म्हंटलं की वेबसाइटवरील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ९९.७ टक्क्यांची डिस्काउंट दिसत होती, त्यामुळं निखिलला फोन देवू शकत नाही. परंतू कंपनीने केला दावा कोर्टाने खोडून काढला आणि निखिलला ६८ रुपयांत मोबाईल देण्याचा आदेश दिला. ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या स्नॅपडीलला कोर्टाने २ हजारांचा दंडही ठोठावला.
स्नॅप़डीलने जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाविरुद्ध पंजाब राज्य ग्राहक फोरममध्ये आव्हान दिले. परंतू पंजाब राज्य ग्राहक फोरमने ग्राहक मंचाचा आदेश कायम ठेवून स्नॅपडीलला दोन हजार रुपयांच्या दंडाऐवजी दहा हजाराचा दंड ठोठावला आणि निखिलला अवघ्या ६८ रुपयात फोन देण्याचा आदेश दिला.
Courtesy Maharastra Times
No comments:
Post a Comment