विलास लेलेनी पेंन्शन या विषयी महाराष्ट्र शासनास पत्र पाठवुन काही सुचना केल्या होत्या त्या सुचनांचे कौतुक करून महाराष्ट्र शासनाने सर्व सुचना आमलात आणल्या व तसे लेरवी कळवले असुन अता तर 1जानेवारी 2016 पासुन पेंन्शन प्रक्रीया अजून सोपी केली आहे अता निव्रुत्त होणा-या व्यक्तींना हेलपाटे मारावे लागणार नाहीत,त्यांनी कुठलेही फाँर्म भरण्याची आवश्यकता नाही अता त्या व्यक्तींना फक्त पेंन्शनआँर्डर(ppo)घेवुन डायरेक्ट ट्रेझरी आँफीसमधे व्हेरीफिकेषन साठी जायचे आहे. व्हेरीफिकेषन साठी आवश्यक ते सर्व काम वेळेत पूर्ण करून सर्व पेपर्स(फोटो व एन ओ सी सह) निव्रुत्त होणा-या कर्मचा-यांच्या कार्यालयाने आँनलाइन ट्रेझरी आँफीसमधे पाठवणे बंधन कारक केले आहे,त्या मुळे अता निवृत्त होणा-या व्यक्तीस ट्रेझरी आँफीसमधे कोणतेही पेपर्स स्वता: घेवून जाण्याची गरज नाही.अता संबंधीत प्रत्येक रवात्यास पेंन्शनचे काम वेळेत पूर्ण करण्याचे कायदेशीर बंधन आहे,वेळेत काम न करणारे दंडास/शिक्षेस पात्र ठरणार आहते, अता निवृत्त होणा-या व्यक्तीस 10 दिवसात पेंन्शन सुरु होणार आहे. ट्रेझरी आँफीसलाही सर्व माहीती मिळताच 10 दीवसांत पेंन्शन प्रक्रीया पूर्ण करून पेंन्शन सुरु करण्याचे बंधन आहे. ट्रेझरी आँफीसचे सर्वांना अतिशय उत्तम सहकार्य असून तिथे कामास कधीही वेळ लागत नाही. शासनाचा लेरवी तप्शील उपलब्धआहे
विलास लेले,ग्राहक पंचायत,कोषाध्यक्ष म.महाराष्ट्र
*सोबत म टा मधे आलेले पत्र व शासनाचे पत्र आहे ते सर्वानी वाचावे*
No comments:
Post a Comment