अखिल भारतीय ग्राह्क पंचायत
690, गली नं.21, फैज रोड, करोल बाग, नई दिल्ली 110055
स्थापना: 1974 पंजियन: एस 9194/197 दिल्ली
राष्ट्रीय अधिवेशन पुणे, 21-22 मई 2016
कार्यालय: 634, सदाशिव पेठ, पुणे 411015 फो 020 24460707
पत्र. स. बिल्डर/2016/03 दि. 23 एप्रील 2016
प्रति ,
1. मा. देवेंद्र फडनवीस, मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुबई 400032
2. मा. किरिट सौमय्याजी, खासदार, लोकसभा, नीलम नगर, मूलुंड, मुंबई 400081
3. मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुबई 400032
4. मा. ग़िरीश बापट, पालक मंत्री व ग़्राहक संरक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, कसबा पेठ, पुणे 4110030
5. मा. अरुण देशपांडे, अध्यक्ष, ग्राहक कल्याण समिति, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुबई 400032
6. मा. आयुक्त, पुणे महानगर पालिका, शिवाजीनगर, पुणे 411005
7. मा. आयुक्त, पिंपरी चिचवड महानगर पालिका, पिंपरी, पुणे 411017
8. मा. आयुक्त, पुणे मेट्रोपोलिटियन रिजन डेव्हलपमेंट अॅँथोरिटि औध, पुणे 411007
9. मा. आयुक्त, पुणे शहर पोलिस, पुणे 411001
10. मा. पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण पोलिस, पुणे 411001
11. मा. इनस्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, कोल्हापूर
विषय : पुण्यातील बिल्डरांचे माफिया राज संपवणे व ग्राहकांना त्यांचे हक्काचे घर मिळणे बाबत
1) पुणे, पिपरी चिचवड व पी एम आर डी ए परीसरातील बिल्डर ग्राहकांना वेठिस धरत आहेत, ताबे देत नाहित, जास्त पैसे मागत आहेत, अनधीकृत व बेकायदा बांधकाम करुन फसवत आहेत
2) प्रशासकीय यंत्रणा ग्राह्कांचे तक्रारीस काहीहि दाद देत नाहित
3) पोलिस यंत्रणा ग्राह्कांचे प्रथम माहीती अहवाल (FIR) नोदवत नाहीत ईत्यादी बाबत
महोदय,
आखिल भारतीय ग्राहक पंचायत हि राष्ट्रिय स्तरावरिल सघटना आहे व ग्राह्कांचे हक्क, कर्तव्य व संरक्षण याबाबत प्रचार, प्रसार व प्रबोधन चे कार्य करते. तसेच वीक्रेता व ग्राहक यांचे समंन्वय करुन तक्रारीची सोडवणूक करणेचे काम करते.
मा. किरिट सौमय्याजींनी मेपल गृप बाबत अत्यंत जबाबदारिने आवाज उठवून कारवाई करणेस भाग पाडले त्याबद्द्ल त्यांचे आखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे जाहिर आभार व महाराष्ट्र सरकारचे आभिनंदन.
ग्राहक मार्गदर्शन चे काम करीत असताना पुणे, पिपरी चिचवड व पी एम आर डी ए परीसरातील असंख्य ग्राह्कांच्या तक्रारी ह्या बिल्डर बाबतीतील येत आहेत व तक्रारिंचे स्वरुप थोडक्यात असे
1. बिल्डर/डेव्हलपर फ्लँटचे बुकींग घेताना दीलेली अश्वासने पाळत नाहीत,
2. काही मजले बेकायदेशीर बाधकाम करून विक्री करणे,
3. प्लॅन मंजूर न करता व हरित लवादाची परवानगी न घेता बांधकाम करणे,
4. एमिनिटि जसे की पोहणेचा तलाव, जिम, बाग, ग्राउंड,कॉमन एनटिना इ. न देणे,
5. मोबाईल टॉवर, जाहिरातीचे फलक साठी टेरेस परस्पर भाड्याने देणे,
6. एमिनिटिच्या जागा विकणे,
7. 20% रक्कम घेउन सुध्धा करारनामा न करणे,
8. पिण्याचे पाणी न देणे, ड्रेनेज लाईन न टाकणे, रस्ता नसणे, लाईट मीटर न देणे,
9. फ्लँटचा ताबा वर्षे, दोन वर्षे ने उशीरा देणे अथवा न देणे,
10. फ्लँटचा ताबा देताना जबरदस्तीने ईतर बाबी जसे क्लबची मेम्बरशीप साठी पैसे उकळणे (एक ते तिन लाख प्रत्येकी), बेकायदेशीर पार्किग विक्री करुन पैसे उकळणे (रु 100000 ते 300000 प्रत्येकी), लाईट मीटर साठी जास्तीचे पैसे उकळणे (रु.50000 ते 100000), सोसायटी नोदणीचे साठी जास्तीचे पैसे उकळणे(रु. 10000 ते 25000), बेकायदेशीर ईंन्फ्रास्ट्रक्च्रर चारजेस उकळणे(एक ते तिन लाख प्रत्येकी), बेकायदेशीर वन टाईम मेटेनेंस चार्जेस (एक ते तिन लाख प्रत्येकी) ईत्यादी घेत आहेत व दिले नाही तर ताबा देत नाहीत,
11. प्रोजेक्ट अर्धवट सोडणे,
12. बांधकाम पुर्णत्वाचा दाखला न घेता फर्निचर साठी ताबा देणे,
13. सोसायटीची रजिश्ट्रेशन न करणे (दहा दहा वष्रे),
14. खरेदिखत करुन जागेचे हस्तांतरण न करणे,
15. एका प्रोजेक्ट्चे पैसे दुसरिकडे वळवणे अथवा जमिनीत गुंतवणे,
16. ग्राहकांना दम दाटी करणे, गुंड प्रवृत्तिच्या लोकांना सोसायटीमधे पाठवणे,
17. ग्राहकांवर पोलिस यंत्रणांमार्फत दबाव टाकणे ईत्यादि
वरिल सर्व बाबी अतिशय गंभिर आहेत व 1963 च्या फ्लँट ओनर्शीप अँक्ट प्रमाणे गुन्हा आहे. सर्व ग्राह्क वर्ग अत्यंत हवालदील आहे व आपल्या प्रशासनातील संक्षम अधिकारि व कर्मचारि वर्ग या बाबतीत डोळे बंद करुन बसले आहेत. जसे या बाबत संक्षम आधिकारि म्हणुन मा. आयुक्त पुणे म.न.पा., पिपरी चिचवड म.न.पा व पी एम आर डी ए हे आशा बिल्डरना ईतर साईट वरिल कामे थाबऊन तसेच नोटिसा काढुन जाब विचारु शकतात व योग्य कारवाई करु शकतात. बेकायदेशीर बांधकाम चालु असताना गप्प बसून नाहक ग्राह्कांना फसवुन देत आहेत.
बिल्डर, प्रशासन, पोलीस व राजकारणी यांची अभद्र युति पुण्यात ज़ाहली आहे, मंत्री लोक ग्राहकांचे संरक्षण कमी व ऊदघाटन मंत्री म्हणुनच जास्त काम करत आहेत. आखिल भारतीय ग्राहक पंचायत ने क्रेडाई च्या फ्लँट प्रदर्शनासमोर ग्राहक प्रबोधनाचे काम करत असताना पोलिसांनी दुसर्या दिवशी बिल्डर लोकांच्या तक्रारिवरुन कार्यकर्त्याना प्रदर्शनासमोर थांबू दिले नाही. काही बिल्डरां बाबत लेखी तक्रारी शासनाकडे केल्या होत्या पण काहिहि कारवाई नाही हि आत्यंत गंभिर बाब आहे.
ग्राहक पंचायतिने गुगल सर्व्हे केला, तसेच रोज ग्राहक स्वता मार्गदर्शन केंद्रात येउन तक्रारी करतात, काही बिल्डर लोकांबाबतच्या आलेल्या गंभिर तक्रारी आपल्या माहितीसाठी देत आहे.
क्र.
बिल्डर चे नाव
प्रोजेक्ट डिटेल्स व आजचे स्टेटस
1
मे. त्रिशुल बिल्डर्स, पुणे
श्री. हेमंत तुकाराम बुध्धिवंत
701 ए, सुंदरी आपार्ट्मेंट, गुरुनानक नगर, भवानी पेठ
पुणे 411002.
शालीनी लेक व्हु प्रोजेक्ट, उंडरी, पुणे ... ...... 500 फ्लॅट
( 8 ते 10 लाख प्रत्येकी)
500 पेक्षा जास्त लोकांकडून पैसे घेवुन सरकारी आरक्षीत जागेत बांधकाम केले, 2010 मधे ईमारत पाडणेत आली. लोकांना पैसे परत केले नाहीत. शेकडो केसेस चालु आहेत. 2011 ला एफ आय आर केला पण काहीहि कार्यवाही नाही
2.
मे. भुजबळ ब्रदर्स कं कंपनी,
श्री सुरज भुजबळ व श्री रंणजीत भुजबळ, भुजबळ हाउस, स.न. 28, कर्वे नगर, पुणे 411052
मिस्ट्री ट्रेल, हडपसर, पुणे ...... 178 फ्लॅट
(सरासरी रु 40 लाख प्रत्येक फ्लॅट)
ताबा 2 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाहि, काहि ईमारतिंचे बाधकाम पण सुरु नाहि. महा. बँकेने पुर्ण प्रोजेक्ट्चा ताबा घेतला आहे कारण प्रोजेक्ट लोन फेडले नाही.
एफ आय आर केला पण काहीहि कार्यवाही नाही
3.
मे. भुजबळ ब्रदर्स कं कंपनी,
श्री सुरज भुजबळ व श्री रंणजीत भुजबळ, भुजबळ हाउस, स.न. 28, कर्वे नगर, पुणे 411052
फोरेस्ट मिस्ट, हडपसर, पुणे ...... 80 फ्लॅट
(सरासरी रु 40 लाख प्रत्येक फ्लॅट)
ताबा 2 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाहि, ईमारतिंचे बाधकाम बंद आहे
4.
मे. भुजबळ ब्रदर्स कं कंपनी,
श्री सुरज भुजबळ व श्री रंणजीत भुजबळ, भुजबळ हाउस, स.न. 28, कर्वे नगर, पुणे 411052
वलय, हडपसर, पुणे ...... 20 फ्लॅट
(सरासरी रु 40 लाख प्रत्येक फ्लॅट)
लाइट मिटर साठि 150000, डेव्हलपमेंट चारजेस 200000 प्रत्येकी.
ताबा 2 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाहि, ईमारतिंचे बाधकाम बंद आहे
रंणजीत भुजबळ, भुजबळ हाउस, स.न. 28, कर्वे नगर, पुणे 411052
लाइट मिटर साठि 150000, डेव्हलपमेंट चारजेस 200000 प्रत्येकी.
ताबा 2 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाहि, ईमारतिंचे बाधकाम बंद आहे
5.
मे. भुजबळ ब्रदर्स कं कंपनी,
श्री सुरज भुजबळ व श्री रंणजीत भुजबळ, भुजबळ हाउस, स.न. 28, कर्वे नगर, पुणे 411052
वाटिका प्रोजेक्ट, बालेवाडी, पुणे ...... 123 फ्लॅट
(सरासरी रु 45 ते 70 लाख प्रत्येक फ्लॅट)
काही मजले बेकायदेशिर बांधले आहेत, अपुर्ण कामे, ग्राहकांना दिलेले चेक बाउंस जाहले, प्रोजेक्ट पुर्णत्वाचा दाखला दिला नाहि,
ताबा 2 वर्षे उशिरा ग्राहक पंचायतीमुळे मिळाल.
अँमिनिटि दिल्या नाहीत (क्लब हाउस, जिम, पार्टि लॉन, गार्डन, अशा आसंख्य अँमिनिटि दिल्या नाहीत) लाइट मिटर साठि 75000
6.
मे. जालान मेपल शेल्टर गृप
श्री अगरवाल
सिटि स्क़वेअर, कृषी महाविद्यालया जवळ, शिवजीनगर, पुणे 411005
औरा सिटि प्रोजेक्ट, शिक्रापुर, पुणे. 1000 फ्लॅट
(14 ते 25 लाख किंमत प्रत्येकी)
बर्याच लोकांना ताबा 2 वर्षे ज़ाहली तरी दिला नाही, प्रोजेक्ट पुर्णत्वाचा दाखला नाहि, केसेस चालु आहेत, प्रोजेक्ट 2011 ला चालु केले. काही ग्राह्कांना ताबा दिला आहे पण तिथे राहु शकत नाही कारण ईतर सुवीधा नाहि. रस्ता नाहि, लाईट मिटर नाही. प्रोजेक्ट पुर्ण नाही तरी 100% रक्कम मागत आहे.
7
मे.मेपल शेल्टर गृप
सिटि स्क़वेअर, शिवजीनगर,
पुणे 411005
भारतीय जन घर योजना 2015/आपल घर योजना ईंडिया हाउसिंग डे
1 मार्च 2015, ग्राहकांनी बुकिंग चे 100000 ते 300000 दिलेत अद्याप पर्यंत कोणाशीही करारनामा केला नाही (15 प्रकल्प रू 11 ते 18 लाख)
8
मे.मेपल शेल्टर गृप
जालन गृप,
प्रिस्टिन प्रोपर्टिज
सिटि स्क़वेअर, शिवजीनगर,
पुणे 411005
निऔ सिटी, वाघोली, पुणे..... 1200 फ्लॅट
( सरासरी 26 लाख किंमत प्रत्येकी)
ताबा 3 ते 4 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाहि, अपुर्ण काम,
लाइट मिटर 25000 प्रत्येकी, इंफ्रास्ट्रक्चर कॉस्ट रु 150000 प्रत्येकी
पार्किंग पोटि रु 150000 प्रत्येकी, सोसायटि साठि रु 5000
9
कुमार अर्बन लिमिटेड,पुणे
श्री ललित कुमार जैन,
के.बी.सी. बिल्डींग, 7 वा मजला, बंडगार्डन, पुणे 411001
कुल इकोलेक, फेज 1, म्हाळुंगे, पुणे ..... 850 फ्लॅट
( सरासरी 55 लाख किंमत प्रत्येकी)
ताबा 2 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाहि, ईमारतींचे बाधकाम पुर्ण नाहि. रोड नाहि, लाइट नाहि, पाणी नाहि, ग्राह्कांनी आंदोलन केले म्हणुन ग्राह्कांवर पोलिसां मार्फत केसेस दाखल केल्या. अँफिडिव्हेट ने माफि नाहि मागितली तर ताबा देणार नाहि असा ग्राह्कांना दम देत आहेत. इंफ्रास्ट्रक्चर कॉस्ट रु 250000 प्रत्येकी,
10
कुमार अर्बन लिमिटेड,पुणे
श्री ललित कुमार जैन,
के.बी.सी. बिल्डींग, 7 वा मजला, बंडगार्डन, पुणे 411001
कुल इकोलेक, फेज 2, म्हाळुंगे, पुणे ..... 750 फ्लॅट
(14 ते 25 लाख किंमत प्रत्येकी)
ताबा 2 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाहि, ईमारतिंचे बाधकाम पुर्ण नाहि. रोड नाहि,लाइट नाहि, पाणी नाहि, ग्राह्कांना पैसे परत करत नाहि. अँमिनिटि दिल्या नाहीत (क्लब हाउस, जिम, पार्टि लॉन, चिल्ड्रन प्ले एरिया, अँम्फि थियेटर अशा आसंख्य अँमिनिटि दिल्या नाहीत )
इंफ्रास्ट्रक्चर कॉस्ट रु 250000 प्रत्येकी,
11
ड्ब्लु एस डेव्हलपर,
श्री योगेश वसंत शेलार,
श्री जयंत वायदंडे, गगन गँलक्सि, मार्केट यार्ड, स्नेह अपार्टमेंट, सह्कार नगर, पुणे
श्रुस्टी रिजंसी,वडगांव, वाघोली, पुणे…1980 फ्लॅट, 36 रो हाउस,93 शॉप्स
(14 ते 37 लाख किंमत प्रत्येकी) टाऊन प्लँनींग ची मंजूरी नाही.
ताबा 1 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाहि, ईमारतिंचे बाधकाम पुर्ण नाहि. कम्प्लिशन सर्टिफिकेट नाहि, अँमिनिटि दिल्या नाहीत. सोसायटि साठि रु 20000 घेतलेत प्रत्येकी, पर्यावरण सर्टिफिकेट नाहि,
पार्किंग पोटि रु 50000 प्रत्येकी घेतले. लाइट मिटर 35000 प्रत्येकी
डेव्हलपमेंट चार्जेस 25000 प्रत्येकी
पुणे
नाहि. कम्प्लिशन सर्टिफिकेट नाहि, अँमिनिटि दिल्या नाहीत. सोसायटि साठि रु 20000 घेतलेत प्रत्येकी, पर्यावरण सर्टिफिकेट नाहि,
पार्किंग पोटि रु 50000 प्रत्येकी घेतले. लाइट मिटर 35000 प्रत्येकी
डेव्हलपमेंट चार्जेस 25000 प्रत्येकी
12
रेनबो ब्युल्डकॉन/ रिव्हेल रिअल्टर्स
अभय फुलपगार, पुणे
रिव्हेल ओर्चिड, लोहेगांव, पुणे...... 550 फ्लँट
(सरासरी रु 34 लाख प्रत्येक फ्लॅट )
ताबा 2 वर्षे उशीरा मिळाला, इंफ्रास्ट्रक्चर कॉस्ट रु 300000 प्रत्येकी
अँमिनिटि दिल्या नाहीत. (क्लब हाउस, जिम, पार्टि लॉन, चिल्ड्रन प्ले एरिया, अँम्फि थियेटर) पुर्णत्वाचा दाखला नाही, म.न.पा.चे पाणी नाही, सोसायटि नाहि, खरेदि खत नाही,
13
श्री जुगराज चांदूलाल परमार व किरण मदनलाल संघवी
887, बुट्टे स्ट्रिट, पुणे 411001
व्हिस्टा लक्सेरिया, मांजरी, पुणे .... 400 फ्लॅट
(सरासरी रु 20 ते 32 लाख प्रत्येक फ्लॅट )
कम्प्लिशन सर्टिफिकेट नाहि, सोलर साठि 35000 प्रत्येकि घेतले, अँमिनिटि दिल्या नाहीत. सोसायटि साठि रु 25000 घेतलेत,पर्यावरण सर्टिफिकेट नाहि, 198 लोकांना ताबा एक वर्षे उशीरा दिला आहे.
पार्किंग पोटि रु 100000 प्रत्येकी घेतलेत. लाइट मिटर 25000
डेव्हलपमेंट चार्जेस 170000 प्रत्येकी
14
राओजी कंस्ट्रक्शन व श्रेयश शेल्टर, धानोरी पुणे
पल्लाडियम ग्रांड, धानोरी, पुणे .... 140 फ्लॅट
8 वर्षे होऊन पण सोसायटि नाहि, पिण्याचे पाणी नाही, अँमिनिटि दिल्या नाहीत, दादागीरी करुन, मारामारी करुन लोकांना घाबरवत आहेत,
फायर फायटिंग नाहि,एस टि पि आथवा ड्रेनेज नाहि, सोलर पँनल नाही, आमदार, नगरसेवक,मनपा कमिशनर याना तक्रार देउन पण उपयोग नाही, पार्किग विकले, अप्रोच रोड नाहि, सहकार खाते मदत करत नाही.
15
सुपर टेक कंस्ट्रक्शन
श्री संतोश सुर्यवंशी, भानु मित्तल
युकर विहार,आर्मि वेलफेअर सो. गोंधळे नगर, हाडपसर, पुणे 28
राधेश्वरी नगरी, डिफेंस कॉलोनी, वाघोलि, पुणे .... 290 फ्लॅट
(सरासरी रु 24 ते 33 लाख प्रत्येक फ्लॅट )
पार्किंग पोटि रु 100000 प्रत्येकी. लाइट मिटर 100000 प्रत्येकी
अँमिनिटि दिल्या नाहीत, ताबा मिळाला नाही, काही मजले मंजूर नाहीत.
16
तिर्थ रियालिटि, पुणे
विजय तुकाराम रौद्ल,
सी 208, लेव्हल 7, तीर्थ टेक्नोस्पेस, मुंबई बँगलोर हायवे,
बानेर, पुणे 411045
आरोहि प्रोजेक्ट, सुस गाव, ... 220 फ्लॅट
(सरासरी रु 25 ते 40 लाख प्रत्येक फ्लॅट)
अँमिनिटि दिल्या नाहीत, काही लोकांना ताबा 6 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाहि, बेसिक ड्रेनेज लाईन नाही, ताबा दिला ते लोक राहु शकत नाही, सिक़ुरिटि नाहि, लिफ्ट चालु नाहि, मेटेनंन्स होत नाहि, पार्किग कमी, कोर्ट केसेस चालु आहेत.
17
ईनर्जिया स्की डेव्हलपर,
श्री अमित अनिल जगताप,
श्री सुशांत जाधव
बी 2, मार्क आपार्ट्मेंट, 36/3, पांडुरंग कॉलोनी, एरंड्वना, पुणे 4
सॉग बर्ड्स, भुगाव, पुणे....1200 फ्लॅट
(सरासरी रु 65 लाख प्रत्येक फ्लॅट)
अँमिनिटि दिल्या नाहीत, ताबा 1 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाहि
रु 200000 क्लब हाउस साठी जागा घेणेसाठी आगाउ दिल्याशिवाय ताबा देत नाही, बांधकाम आपुर्ण आहे.
मेंटेनंस पोटि रु 150000 प्रत्येकी. लाइट मिटर 25000
ईंफ्रा स्ट्रक्चर चार्जेस 300000 ते 500000 प्रत्येकी
पांडुरंग कॉलोनी, एरंड्वना, पुणे 4
ताबा देत नाही, बांधकाम आपुर्ण आहे.
मेंटेनंस पोटि रु 150000 प्रत्येकी. लाइट मिटर 25000
ईंफ्रा स्ट्रक्चर चार्जेस 300000 ते 500000 प्रत्येकी
18
मंत्री इंटरसीटि
मंत्री हाउस, 929 एफ सी रोड पुणे 411004
मंत्री इंटरसीटि प्रोजेक्ट, दापोडी, पुणे 12 ..... 100 फ्लॅट
(रु 65 लाख ते 1 कोटि प्रत्येक फ्लॅट)
90% रक्कम घेतली आहे. अँमिनिटि दिल्या नाहीत, बांधकाम पुर्ण नाही
ताबा 1 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाही. सध्या बांधकाम बंद आहे.
19
क्रिएटोज़ बिल्डर प्रा. लि. धीरज रिअल्टी एच.डि.आय.एल टॉवर, 4 था मजला, आनंत कानेटकर मार्ग, बाद्रा पुर्व, मुंबई 400051
जेड रेसिडेंसेस, वाघोली, पुणे .....1000+ फ्लॅट
(सरासरी रु 40 लाख प्रत्येक फ्लॅट)
ताबा 2 वर्षे होउन गेले तरि मिळाला नाहि, बेकायदेशीर मजले बांधकाम
बांधकाम पुर्ण नाही, अँमिनिटि दिल्या नाहीत, लाइट मिटर 60000,
डेव्हलपमेंट चार्जेस 19000 प्रत्येकी, सोसायटि साठि रु 10000
पार्किंग पोटि रु 150000 ते 200000 प्रत्येकी
20
के. डि. एस. इंफ्रा बिल्डकॉनस
शॉप न. 18, शॉपर्स ऑरबीट, ए विंग, विश्रांतवाडी, पुणे 411015
भुपेंद्रसिंग धिंलोन, एंन 1, 508, साई द्वारकामाई सो. एन.आय. बी.एम रोड, कोढवा, पुणे 48
के. डि. एस आंगण व के. डि. एस धाम,चर्होली, पुणे … 500 फ्लॅट
(सरासरी रु 11 लाख प्रत्येक फ्लॅट)
ग्राह्काचे 50000 ते 450000 रुपये घेतले ते परत दिले नाहीत
स्कीम कधीही जाहली नाही, सदर जागा दुसरेस विकली, दिलेले चेक बाउंस होउन परत आले. (काही लोकांनी केस केली इतर लोक आजुन फसलेले आहेत.) पोलिसांकडे गुन्हा नोंदवला आहे काहीही कारवाई नाही
21
सहजानंद हायटेक कं. प्रा.ली.
लोढा एक्स्स्लुसिव्ह, लेवल 2, आपोलो मिल कंपाउंड,
न.म. जोशी मार्ग, महालक्ष्मी,
मुंबई 400011
लोढा बेलमोंडा, गहुंजे, पुणे
(सरासरी रु 50 लाख प्रत्येक फ्लॅट)
2013 साली करारनामा केल्यावर परत किंमत वाढवुन मागत आहेत
ज्यास्तीचे पैसे दिल्याशिवाय ताबा देत नाही. आपला फ्लँट दुसर्याला विकला आहे असे काहि लोकांना सांगत आहेत.
22
विवा स्वराज
रजनिश मेहता
94/24, बिहारी दीप, लेन 11,
प्रभात रोड,पुणे 411004
विवा हालमार्क, बावधन, पुणे .... 250 फ्लँट
अँमिनिटि दिल्या नाहीत, पार्किंग पोटि रु 100000,
सोसायटि नाहि, पाणी टँकर द्वारे,
२२
सुयोग कोर्पोरेशन
पर्स्वा बिल्डिंग, मुकुंद नगर, पुणे
सुयोग निसर्ग, वाघोली, पुणे ....... 600 फ्लँट,
(सरासरी रु 32लाख प्रत्येक फ्लॅट)
ताबा 1 ते 2 वर्षे उशीराने, सोसायटि नाहि, अँमिनिटि दिल्या नाहीत, बांधकाम पुर्णत्वाचा दाखला नाही,
इन्फ्रास्ट्रकचर चार्जेस 170000 प्रत्येकी,
अँमिनिटि चार्जेस रु 200000 प्रत्येकी
23
साई आसोसिएटस
साई लक्ज़ेरीया, रहाटणी, पुणे........ 132 फ्लँट,
(सरासरी रु 32लाख प्रत्येक फ्लॅट)
ताबा 6 महीने उशीराने,
इन्फ्रास्ट्रकचर चार्जेस 50000 प्रत्येकी,
लाइट मिटर 50000
वन टाईम मेटेनंस चारजेस 24000
24
ऑक्सफर्ड पँराडाईज,
रोहनआनिरुध्ध शेवलेकर,
स.न. 127/6/2, सुस, पुणे
ऑक्सफर्ड पँराडाईज, सुस, पुणे ....... 200 फ्लँट,
(सरासरी रु 16 लाख प्रत्येक फ्लॅट)
सोसायटि नाहि, अँमिनिटि दिल्या नाहीत
25
एन.डि.टॉवर,
नंदकुमार भोंद्वे व काळभोर
ज्ञानेश्वर नगर
आकुर्डि, पुणे 35
एन.डि.टॉवर........ 118 फ्लँट,
(सरासरी रु 30 लाख प्रत्येक फ्लॅट)
अँमिनिटि चार्जेस रु 25000 प्रत्येकी
लाइट मिटर 25000 प्रत्येकी
पार्किंग पोटि रु 150000 प्रत्येकी
वन टाईम मेटेनंस चारजेस 25000 प्रत्येकी
आकुर्डि, पुणे 35
लाइट मिटर 25000 प्रत्येकी
पार्किंग पोटि रु 150000 प्रत्येकी
वन टाईम मेटेनंस चारजेस 25000 प्रत्येकी
26
एन.के.डेव्हलपर्स,
पुणे
प्राईड ग्रीन फिल्डस., पिंपळे निलख, पुणे ...... 105 फ्लँट,
(सरासरी रु 380000 लाख प्रत्येक फ्लॅट)
सोसायटि नाहि, अँमिनिटि दिल्या नाहीत
केस चालु आहे
27
आय व्हि वाय ईस्टेट,
कोलते पाटिल
सिटि टॉवर, ढोले पाटिल रोड, पुणे
आय व्हि वाय, ........1000 फ्लँट,
(सरासरी रु 430000 लाख प्रत्येक फ्लॅट)
अँमिनिटि चार्जेस रु 150000 प्रत्येकी
लाइट मिटर 50000 प्रत्येकी
पार्किंग पोटि रु 150000 प्रत्येकी
इन्फ्रास्ट्रकचर चार्जेस 75000 प्रत्येकी
वन टाईम मेटेनंस चारजेस 116000 प्रत्येकी
पार्किंग कमी आहे.
28
सुकांतो राय डेव्हलपर,
साधु वासवानि, पुणे 1
सुरभि हँबीटेट, धानोरी,……. 12 फ्लँट
सोसायटि नाहि, करारनाम्याप्रमाणे काम नाही, पाणी कमी
29
सुयोग कंस्ट्रक्शन
आय टि आय रोड,
औध, पुणे 7
सुयोग सँफरोन, रहाटणी, पुणे...... 84 फ्लँट
पाणी कमी
लाइट मिटर 75000 प्रत्येकी
पार्किंग पोटि रु 125000 प्रत्येकी
30
कमल राज प्रोपर्टिज
दिघी, पुणे
कमलराज बालाजी रेसिडेसी, दिघी, पुणे ......... 160 फ्लँट,
(सरासरी रु 350000 लाख प्रत्येक फ्लॅट)
सोसायटि नाहि, पाणी टँकर द्वारे
पार्किंग पोटि रु 150000 प्रत्येकी
लाइट मिटर 60000 प्रत्येकी
वन टाईम मेटेनंस चारजेस 30000 प्रत्येकी
सोसायटि पोटि रु 30000 प्रत्येकी
31
डि.एस कं.
टिंगरे नगर, पुणे 15
युनिक आयकोन, भैरव नगर, पुणे 15.................9 फ्लँट
सोसायटी नाही, 7 वर्षे पासुन काम अपूर्ण
सोसायटि पोटि रु 50000 प्रत्येकी
32
प्राईड परपल गृप व रेंबो हाउसिग
एस बी रोड, पुणे
पार्क स्प्रिंग, धानोरि, लोहेगाव.............. 392 फ्लँट
(सरासरी रु 300000 प्रत्येक फ्लॅट)
पाणी टँकर द्वारेच, उशीरा ताबा
पार्किंग पोटि रु 350000 प्रत्येकी
33
पियुश ठकार, वाकड
मँक्सिमा, वाकड..............................174 फ्लँट,
(सरासरी रु 300000 प्रत्येक फ्लॅट)
सोसायटि नाही
पाणी टँकर द्वारेच, 1 ते 2 वर्षे उशीरा ताबा
पार्किंग पोटि रु 150000 प्रत्येकी
लाइट मिटर 50000 प्रत्येकी
वन टाईम मेटेनंस चारजेस 15000 प्रत्येकी
सोसायटि पोटि रु 15000 प्रत्येकी
34
पुराणीक बिल्डर प्रा.लि.
कांचनपुष्प, घोड बंदर ठाणे प.
400601
अबितने प्रोजेक्ट, बावधन, पुणे ...
ग्राहकांनी फ्लॅट रद्द केला तर त्यास पैसे परत दिले जात नाहीत.
फ्लॅट रद्द केला तर लाख रुपये कापले जातिल आसा दम दीला जातो.
35
आश्विनि डेव्हलपर
कासार वाडि, पुणे
ग्रिन लँड्स, रहाटणी, पुणे .......... 293 फ्लँट,
(सरासरी रु 45 लाख प्रत्येक फ्लॅट)
अँमिनिटि नाहीत
पार्किंग पोटि रु 125000 प्रत्येकी
लाइट मिटर 50000 प्रत्येकी
वन टाईम मेटेनंस चारजेस 36000 प्रत्येकी
सोसायटि पोटि रु 30000 प्रत्येकी
अँमिनिटि चार्जेस रु 300000 प्रत्येकी
इन्फ्रा स्ट्रकचर चार्जेस रु 200000 प्रत्येकी
पार्किंग पोटि रु 125000 प्रत्येकी
लाइट मिटर 50000 प्रत्येकी
वन टाईम मेटेनंस चारजेस 36000 प्रत्येकी
सोसायटि पोटि रु 30000 प्रत्येकी
अँमिनिटि चार्जेस रु 300000 प्रत्येकी
इन्फ्रा स्ट्रकचर चार्जेस रु 200000 प्रत्येकी
36
लश लाइफ प्रोपर्टिज,
404, न्युक्लिअस मॉल,
कँप, पुणे 1
ओ व्हि ओ लश लाइफ, ऊंडरी, पुणे ......... 352 फ्लँट,
(सरासरी रु 55 लाख प्रत्येक फ्लॅट)
मागील 1 ते 2 वर्षे जाहले ताबा नाही
सोसायटि पोटि रु 25000 प्रत्येकी
अँमिनिटि चार्जेस रु 100000 प्रत्येकी
इन्फ्रा स्ट्रकचर चार्जेस रु 325000 प्रत्येकी
37
ईश्वर परमार,
परमार टॉवर, बंड्गार्ड्न, पुणे
रिव्हर रेसिडेसी, चिखली, पुणे........ 261 फ्लँट,
(सरासरी रु 25 ते 30 लाख प्रत्येक फ्लॅट)
लाइट मिटर 30000 प्रत्येकी
अँमिनिटि नाहित , पाणी टँकर द्वारेच,
बेकायदेशिर बांधकाम, कार व मोटार सायकल पार्कीग विकली
38
विजय लक्ष्मि डेव्हलपर
पि. एस. प्लाजा, येरवडा , पुणे
लक्ष्मी सत्यम रेसिडेसी, धानोरी,……… 70 फ्लँट,
(सरासरी रु 40 लाख प्रत्येक फ्लॅट)
इन्फ्रा स्ट्रकचर चार्जेस रु 100000 प्रत्येकी
लाइट मिटर 30000 प्रत्येकी
पार्किंग पोटि रु 150000 प्रत्येकी
पाणी टँकर द्वारेच, कंप्लिशन नाही
39
मित्तल ब्रदर्स चैतन्य डेव्हलपर
ट्रिड्म पार्क, म्हस्के वस्ती, पुणे 15 ....... 156 फ्लँट,
(सरासरी रु 50 लाख प्रत्येक फ्लॅट)
अँमिनिटि दिल्या नाहीत, पार्किंग पोटि रु 75000,
लाइट मिटर 75000, अँमिनिटि चार्जेस रु 50000 प्रत्येकी
40
सतिश आप्पाजी सावंत
सँक्रेड वर्ल्ड, वानवडि, पुणे
पवन पार्क, महंमद वाडि, पुणे
लोकांचे लाखो रुपये 2013 सालि घेउन पण अँग्रिमेंट करत नाही
सदर वरील सर्व बिल्डरांबाबत च्या तक्रारि या काहि प्रत्यक्ष येउन तर काही गुगल सर्वे द्वारे मिळाल्या आहेत. तक्रारीचे स्वरुप पाहिले तर गंभिर स्वरूपाच्या तक्रारी आहेत व गंभिर गुन्हे केले आहेत असे सकृत दर्शनी वाट्ते.
· लाखो रुपये कर्ज काढुन व जवळची जमापुंजी खर्च करुन ग्राह्कांनी फ्लँट खरेदी करणेस बिल्डर बरोबर करारनामे केले, सदर करारनामे नोद्णी साठि स्टँप ड्युटि व नोंदणी फि पोटी शासनास 5 ते 6 टक्के रक्कम भरली, बँकेचे कर्ज काढ्ले व बिल्डर ला लाखो रुपये दिले पण तरीही आपला फ्लँट काही मिळाला नाही, ताबा तारिख उलटुन वर्षे गेली, शासनाकडे, म.न.पा. कडे तक्रारी केल्या पण आजून ताबा मिळाला नाही. 1963 च्या महाराष्ट्र फ्लँट ओनरशीप अँक्ट नुसार व सीव्हिल प्रोसिजर कोड नुसार हा गंभिर गून्हा आहे.
· घराचा ताबा मिळाला नाहि त्यामुळे महीना रु 5000 ते रु 10000 घर भाडे, घर कर्जावर मासिक हाजरो रुपये प्री ई एम.आय व्याज, लिव्ह अँड लायसंस पोटि दर 11 महिन्यांनी 2500 रुपये चा भुरदंड, भाड्याचे घर बद्लणेसाठि दर 11 महिन्यांनी सामानाची ने आण करणेस टेंम्पो भाडे असे आनेक प्रश्न्न, मानसिक त्रास व आर्थिक भुरदंड सहन करावा लागत आहे व या सर्वास केवळ बिल्डर जबाबदार आहे. त्यामुळे प्रचलीत कायद्यानुसार अशा बिल्डरवर गुन्हे दाखल ज़ाहले पाहिजेत
· 1963 च्या महाराष्ट्र फ्लँट ओनरशीप अँक्ट नुसार व सुप्रिम कोर्टाचे आदेशानुसार पार्किंग, मोकळी जागा, अँमेनेटी स्पेस, टेरेस इत्यादी विकता येत नाही. पण वरिल माहीतिप्रमाणे कितीतरी लाखो,करोडो रुपये पार्किंगच्या नावावर व ईतर नावावर बिल्डर लोकांनी ग्राहकांकडून लुटले आहेत.
· तसेच काही बिल्डर लोकांनी अमेनेटि चार्जेस, इंफ्रास्ट्रक्चर चार्जेस, क्लब हाउस, डेव्हलपमेंट चर्जेस या नावाखाली ग्राह्कांकडून लाखो रुपये काढले आहेत तो पण 1963 च्या महाराष्ट्र फ्लँट ओनरशीप अँक्ट नुसार गुंन्हा आहे कारण सदर कायद्यानुसार मॉडेल करारनाम्यात अशी तरतुद नाही.
· सोसायटी अँक्ट 1960 नूसार व सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे आदेशानुसार सोसायटी स्थापने साठी फक्त 700 रुपये प्रती फ्लँट इतकाच खर्च येतो पण वरिल माहीतिप्रमाणे कितीतरी जास्त पैसे बिल्डर लोकांनी लुटले आहेत
· कितितरी बिल्डरांनी क्लब हाउस साठि तसेच इतर बाबींसाठी जबरस्तीने पैसे घेतले आहेत हा एम आर टि पी अँक्ट नुसार गुन्हा आहे.
· महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळ व शासनाचे परिपत्रकानुसार घरगुती लाइट मिटरसाठि रू 7000 ते रु 10000 एढाच खर्च येतो पण बिल्डर लोकांनी ग्राहकांकडुन कितीतरी जास्त पैसे लुटले आहेत.
· वन टाइम मेंटेनंन्स पोटी पैसे घेणेची तरतूद 1963 च्या महाराष्ट्र फ्लँट ओनरशीप अँक्ट मधे नसुनही कितीतरी बिल्डर बेकायदेशिर पणे प्रती स्क़ेअर फूट प्रमाणे लाखो रुपये घेत आहेत हा पण गुन्हा आहे.
· सोसायटिची स्थापना न करणे व खरेदिखत न करणे हे 1963 च्या महाराष्ट्र फ्लँट ओनरशीप अँक्ट नुसार गंभिर गुन्हे आहेत
· लोकांना धमकी देणे, लोकांनी निदर्शने केली म्हणुन त्यांना ताबा देणेस नकार देणे हा सीव्हिल प्रोसिजर कोड नुसार गंभिर गून्हा आहे.
· पोलीस व प्रशासन हे लोकांसाठि आहे पण भ्रष्टा चारामुळे व आर्थिक कारणांमूळे सामान्य लोकांना न्याय देत नाहीत त्यामुळे अशा कर्त्यव्यातकसूर करण्यार्या अधिकारि वर्गावर कठोर कार वाई करावी
मा. कलेक्टर पुणे जिल्हा यांचेसह, कमिशनर पुणे म.न.पा., कमिशनर पिपरी चिचवड म.न.पा व कमिशनर पी एम आर डी ए यांच्यासह, ग्राह्क प्रतिनिधी व पुणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे प्रतिनिधीची एक कमिटि नेमुन प्रत्येक बिल्डरची चौकशी करावी तसेच आपल्या सक्षम अधिकारी वर्गास योग्य त्या सुचना देउन वरील सर्व बिल्डरचे प्रोजेक्टस बरोबरच ईतर सर्व बिल्डरची प्रोजेक्टसची तपासणी करून ज्यास्तीचे घेतलेले पैसे परत करणेस भाग पाडावे व सामान्य लोकांना न्याय द्यावा.
· शासनाने रिअल ईस्टेट बिलाची अंमलबजावणी त्वरित सुरु करावी.
· फ्लँट्चा ताबा न दिलेल्या ग्राह्कांना त्वरीत ताबा देणेस बिल्डरना आदेश द्यावा ही विनंती.
· ग्राहकांना त्यांचे जास्तीचे घेतलेले पैसे व्याजासह परत करणेचा आदेश द्यावा ही विनंती.
· बिल्डरांवर मोफा कायद्या नुसार व इतर कायद्यानुसार कडक कारवाई करावी ही विनंती.
· जरुर पडली तर मोका लाउन कारवाई करावी ही विनंती.
येत्या एक महीन्यात शासनाने कडक कारवाई केली नाही तर आखिल भारतीय ग्राहक पंचायत ऊग्र स्वरुपाचे आंदोलन करेल तसेच मुंबई हाय कोर्टात जनहीत याचीका दाखल करेल याची नोंद घ्यावी
कळावे
आपले विश्वासु
आखिल भारतीय ग्राहक पंचायत करीता
विजय सागर सिमा भाकरे विलास लेले
9422502315 9860368123 9823132175
No comments:
Post a Comment